लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. या अंतर्गत आज १ मार्चला धरमपेठ झोनमधील जलकुंभांची स्वच्छता करण्यात येणार आहे. सोमवार रोजी धंतोली जलकुंभ, ३ मार्चला रामनगर जलकुंभ तर ८ मार्चला दाभा जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. जलकुंभ स्वच्छतेमुळे त्या-त्या दिवशी संबंधित जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार नाही.
...
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग
धंतोली जलकुंभ: संपूर्ण धंतोली भाग, कॉंग्रेस नगर, तकिया स्लम.
रामनगर जलकुंभ: रामनगर, बाजीप्रभू नगर, अंबाझरी ले-आऊट, वर्मा ले-आऊट, समता नगर, गोकुळपेठ, तेलंगखेडी, हिंदुस्थान कॉलनी, भरत नगर, मरारटोली, महात्मा फुले स्लम, पांढराबोडी स्लम, सुदाम नगरी स्लम, अंबाझरी टेकडी स्लम.
दाभा जलकुंभ: दाभा वस्ती, शासकीय मुद्रणालय कॉलनी, आशादीप सोसायटी, वेणूवन सोसायटी, वेलकम सोसायटी, गंगा नगर, मकरधोकडा, ठाकरे लेआऊट, संपूर्ण हजारीपहाड भाग, जगदीश नगर, भिवसेनखोरी, गौतम नगर, आशा बालवाडी.