लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित केले होते. प्ले-ग्रुप/नर्सरीमध्ये प्रवेशासा ज्या बालकांचे ३० सप्टेंबरपर्यंत वय ३ व पहिल्या वर्गाच्या प्रवेशासाठी ६ वर्ष होत असेल त्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे १ ते २ दिवस कमी असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्यांचे वर्ष वाया जात होते.यासंदर्भात शासनाकडे तक्रारी व निवेदनही प्राप्त झाले होते. याची दखल घेत शासनाने शाळा प्रवेशासाठी वयाची अट शिथिल केली आहे. यात १५ दिवसांची शिथिलता दिली आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकांना प्रवेश घेण्यासाठी १ दिवसही कमी असेल तर प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत होते. यासंदर्भात आरटीई अॅक्शन कमिटीने शासनाला निवेदन देऊन, यात शिथिलता आणण्याची मागणी केली होती. राज्यभरातून अशी निवेदने व तक्रारी शासनाकडे दरवर्षी प्राप्त होत होत्या. त्याची दखल घेऊन शासनाने वयोमर्यादेत १५ दिवसांची सुट दिली आहे. यासंदर्भात शासनाने २५ जुलैला शासन निर्णय काढला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन आदेशानुसार पत्र काढून सर्व व्यवस्थापनाच्या शाळेंच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, ज्या बालकांचे वय ३० सप्टेंबर २०२० रोजी ६ वर्ष असेल किंवा ६ वर्ष पूर्ण होण्यास १५ दिवस बाकी असेल, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. पण १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होत असेल तर, त्यांन नियमानुसार प्रवेश देता येणार नाही.
शाळा प्रवेशासाठी आता १५ दिवसांची शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:40 AM
शासनाने शाळा प्रवेशासाठी वयाची अट शिथिल केली आहे. यात १५ दिवसांची शिथिलता दिली आहे.
ठळक मुद्दे पालकांना दिलासा शासन निर्णय जारी