कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज बिलाच्या संदर्भात राज्यात असंतोष पसरला आहे. ग्राहकांचे म्हणणे आहे की, बिलामध्ये गडबड आहे, अनावश्यक बिल पाठविण्यात आले आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, तीन महिन्याचे बिल असल्यामुळे स्वाभाविकच ते जास्त आहे. या दाव्या प्रतिदाव्यात ‘लोकमत’ला मोठी गडबड झाल्याची माहिती मिळाली. महावितरणच्या सूचनेनुसार लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक महिन्याला मीटर रिडिंग पाठविणाऱ्या ग्राहकासोबतच ही फसवणूक झाली. त्यांना ३० दिवसाच्या जागी १९ दिवसाचे बिल पाठविण्यात आले. पण त्यांना शून्य ते शंभर युनिटचा असलेल्या स्लॅबचा लाभ मिळाला नाही. त्यांना जास्त दराच्या स्लॅबचे बिल पाठविण्यात आले.तारखेत फेरफार करून ग्राहकांना अधिक बिल पाठविले. ही गडबड कशी झाली, हे एका बिलाच्या माध्यमातून तुम्हाला समजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सिव्हील लाईन्स येथील एक ग्राहकाने लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग महावितरणच्या अॅपवर पाठविले. मे महिन्याच्या २ तारखेला ग्राहकाला रिडिंग पाठविण्यासाठी मॅसेज आला आणि त्यांनी तात्काळ रिडिंग पाठविले. परंतु महावितरणने ही रिडिंग त्यांच्या सिस्टीममध्ये १६ मे रोजी अपलोड केली. या आधारावर ग्राहकाला १६ मे ते ६ जूनपर्यंत बिल देण्यात आले. तारखेत केलेल्या या बदलामुळे ग्राहकाला किमान युनिट असलेल्या स्लॅबचा लाभ मिळू शकला नाही.२९३७ ऐवजी ३६११ रुपयांचे बिल१ ते १५ मे दरम्यान रिडिंग पाठविणाऱ्या ग्राहकांच्या बिलामध्ये गडबड झाली आहे. लोकमतने ज्या ग्राहकाच्या बिलाच्या आधारावर हा प्रकार समोर आणला. त्यांना ३६११.४९ रुपये बिल देण्यात आले. जर हे बिल पूर्ण महिन्याचे असते तर २९३७.८९ रुपये आले असते.कसे वाढले वीज बिलग्राहकाने महिन्याभरात ३२२ युनिटचा वापर केला. १९ दिवसाचे बिल असल्याने त्यांना ०.६३ फ्रॅक्शन (अंश) च्या हिशेबाने केवळ ६३ युनिटसाठी ० ते १०० युनिट (सर्वात कमी स्लॅब ) चे दर लावण्यात आले. १२६ युनिटसाठी १०१ ते ३०० युनिटचे दर लावण्यात आले. त्याचप्रकारे १२६ युनिटसाठी ३०० ते ५०० युनिट व ७ युनिटसाठी ५०० च्या वर युनिट वापरल्यावर जे दर लावण्यात येते, ते लावण्यात आले. जर पूर्ण कालावधीनुसार बिल देण्यात आले असते तर ग्राहकाला ११० युनिटसाठी बिल ० ते १०० चा स्लॅब व २१२ युनिटसाठी ० ते ३०० युनिटची दर लावण्यात आले असते.
स्लॅबनुसार कसे वाढतात दरउपयोग दर०-१०० युनिट ३.४६ रु.१०१-३०० युनिट ७.४३ रु.३०१-५०० युनिट १०. ३२ रु.५००-१००० युनिट ११.७१ रु.१००१ पेक्षा अधिक ११.७१ रु.प्रकरणाची चौकशी करेल : महावितरणमहावितरणने या प्रकरणाला गंभीरतेने घेतले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, बिल स्वॉफ्टवेअरनुसार तयार होते. बिल कमी दिवसांचे कसे तयार झाले, हा चौकशीचा विषय आहे. कंपनी प्रकरणात चौकशी करून आपली बाजू मांडेल.