शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

आहे निवांत वेळ तरी ‘अमृताचा ठेवा’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 8:56 AM

तू सर्वशक्तीमान असल्याचा आव आणतोस, मात्र एका अदृष्य विषाणूपुढे हतबल आहेस ही जाणिव हा कोरोना करवून देत आहे. एकांतवासात संपूर्ण जग गेले आहे. अशा काळात विचारकांनी दिलेला पुस्तकरूपी ‘ अमृताचा ठेवा’ वाचायची इच्छा असली तरी तो त्यांच्याकडे उपलब्ध नाही, या वेदना व्यक्त व्हायला लागल्या आहेत.

ठळक मुद्देवाचनाची इच्छा असली तरी व्हाट्सअ‍ॅप शिवाय पर्याय नाहीकेवळ फॉरवर्डवर आहे भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या चिंतकांच्या, विचारवंतांच्या, भाष्यकारांच्या पुस्तकरूपी अनुभवांनी माणूस संपन्न झाला, त्याच पुस्तकांकडे तो दुर्लक्ष करू लागला. विचारकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू लागला. कोरोनाचा महामार मानवाला त्याची जागा दाखवत आहे. तू सर्वशक्तीमान असल्याचा आव आणतोस, मात्र एका अदृष्य विषाणूपुढे हतबल आहेस ही जाणिव हा कोरोना करवून देत आहे. एकांतवासात संपूर्ण जग गेले आहे. अशा काळात विचारकांनी दिलेला पुस्तकरूपी ‘ अमृताचा ठेवा’ वाचायची इच्छा असली तरी तो त्यांच्याकडे उपलब्ध नाही, या वेदना व्यक्त व्हायला लागल्या आहेत.निवांत वेळेते पुस्तकांशिवाय दुसरा सच्चा मित्र नाही. मात्र, हे मित्र आपाधापीच्या काळात मानव हरवून बसला आणि आता त्याची गरज असल्याने तोच मित्र उपलब्ध नसल्याची ओरड अनेकांकडून होत आहे. वाचनाची इच्छा असली तरी व्हाट्सअप, फेसबूक, इंटरनेटशिवाय त्याच्याकडे पर्याय नसल्याचे दिसून येते. पुस्तक वाचनाचा अनुभव अत्यंत आध्यात्मिक असतो. पुस्तकांची संगत वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारी असते. मात्र, आता पर्याय नसल्याने व्हाट्अप, इंटरनेटवरच ती वाचावी लागत आहे. छोट्या स्क्रिनमुळे विचारशक्तीही छोटी झाली आणि सतत वेगवेगळे नोटीफिकेशन मिळत असल्याने, वाचनात खंड पडतो आहे. जे काही वाचले त्याचा आनंदही केवळ वाचण्यापुरताच मिळतो आणि इंटरनेट बंद झाले की तो आनंद मिटतो. तरी देखील फॉरवर्डचा महापूर सर्वत्र आला आहे. त्यातही कितीजण ते फॉरवर्ड पुस्तके वाचत आहेत, हा मोठ्ठा प्रश्न आहे.सच्चिदानंद शेवडे, चारुदत्त आफळे झाले सक्रीय: ज्यांना छोट्या स्क्रीनवर वाचने अवघड होत आहे, अशासाठी राष्ट्रीय प्रबोधनकार सच्चिदानंद शेवडे व राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांच्यासारखे तज्ज्ञ अभ्यासक सक्रीय झाले आहेत. महापुरुषांचे चरित्र व प्रेरक कथा त्यांच्या शैलित फेसबूक व व्हॉट्सअपवर लाईव्ह किंवा व्हीडीओ अपलोड करून नागरिकांना सांगत आहेत. अनेक मोठे अभ्यासक सोशल डिस्टन्सिंगच्या काळात नागरिकांच्या रिकाम्या मेंदूला प्रेरित करण्याचे कार्य करत आहेत.पीडीएफ फाईल्स होतोहेत व्हायरल: प्रत्येकालाच वाचन संस्कृतीशी जोडणारा एक उपक्रम सुरू झाला आहे. यात वि. स. खांडेकर यांचे ययाती, वि. दा. सावरकर लिखित माझी जन्मठेप, शिवाजी सावंत लिखित युगंधर, रणजित देसाई लिखित पावनखिंड, छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण व पु. ल. देशपांडे लिखित बटाट्याची चाळ अशा काही पुस्तकांच्या पीडीएफ व्हायराल होऊ लागल्या. सगळेच सगळ्यांना वाचण्याचे आवाहन करत आहेत.येथेही वैचारिक भिन्नता: व्हाट्सअपवर किंवा फेसबूकवरही पुस्तकांचे प्रसारण करताना वैचारिक भिन्नता दिसून येत आहे. उजव्या विचारकांनी आपल्या शैलीची पुस्तके व्हायरल करण्यास सुरुवात केल्याचे बघून डावे विचारकही सरसावले आहेत. तसेच फेसबूक लाईव्ह किंवा व्हिडीओ अपलोड केले जात आहेत.अमृताचा ठेवा बाहेर काढा आणि वाचन करा - बापू चनाखेकर: खरे तर ह्यमन डिस्टन्सिंग आपल्याकडे व्यस्ततेमुळे सुरूच आहे. कोरोनाने सोशल डिस्टन्सिंग अनुभवतो आहे. पुस्तके ही अमृताचा ठेवा आणि हा ठेवा घरात असेल तर तो बाहेर काढा आणि वाचन करा. कोरोनामुळे एकांतवास काय असतो, याचे महत्त्व अनेकांना कळले असेल. या एकांतवासाचा सदुपयोग करा. गाथा, कथा, अभंग, नाटक यांचे पारायण करा आणि पुढच्या पिढींना समृद्ध करा, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी बापूकाका उपाख्य अनिल चनाखेकर यांनी केले आहे. 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस