शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

कडाक्याचे भांडण अन् रात्रीचा झाला दिवस

By admin | Published: April 23, 2017 2:53 PM

तिसऱ्या दिवशीच्या रात्रीला युवती कुणासोबत राहील, यावरून आरोपी मनोज विनोद भगत (वय ४४) आणि रजत तेजलाल मद्रे

नरेश डोंगरे

नागपूर, दि. 23 - तिसऱ्या दिवशीच्या रात्रीला युवती कुणासोबत राहील, यावरून आरोपी मनोज विनोद भगत (वय ४४) आणि रजत तेजलाल मद्रे (वय १९) या दोघांमध्ये १६ एप्रिलच्या रात्री आमदार निवासाच्या परिसरात जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर युवती आणि रजत हे दोघे मध्यरात्री आमदार निवासातून निघून गेले. ही संपूर्ण रात्र युवती आणि रजतने राजनगरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घालवली. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या आमदार निवासातील सामूहिक बलात्कार प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती उजेडात येऊ लागली आहे. त्यातीलच ही माहिती खास सूत्रांच्या माध्यमातून लोकमतला मिळाली आहे. आरोपी मनोज आणि रजतच्या वयात दुपटीपेक्षाही जास्त फरक आहे. त्यांच्यात मैत्री नाहीच, ओळख होती ती युवतीमुळे. मात्र, वडिलाच्या वयाचा व्यक्ती त्याच्या मैत्रिणीसोबत शरीरसंबंध जोडत असल्यामुळे आरोपी रजतला तिसऱ्या दिवशी भान आले. इकडे ठरल्याप्रमाणे मनोज भगत १६ एप्रिलच्या रात्री ९ वाजता आमदार निवासात आला. रजतने बाहेर निघून जावे, अशी त्याची इच्छा होती. मात्र, रजतने बाहेर पडण्यास नकार दिल्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर ते तिघे खोलीतून हिरवळीवर आले. तेथेही मनोज आणि रजतमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रजत मैत्रिणीला (युवतीला) घेऊन बाहेर पडला. रात्री १२ वाजता ते परत आमदार निवासाच्या परिसरात आले. यावेळी त्याना आरोपी मनोज तेथेच दिसला. रागाने चरफडत असलेल्या मनोज आणि रजतमध्ये पुन्हा वाद झाला. बराच वेळ हे दोघे भांडत होते. आमदार निवासाचे कर्मचारी यावेळी काय करीत होते, हा चौकशीचा विषय आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या आमदार निवासाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मनोज आणि रजत या दोघांमधील भांडण दिसत आहे. भांडण थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे अखेर रजत आणि युवती तेथून बाहेर पडले. ते राजनगरात रजत राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहचले. तेथे एका कोपऱ्यात त्यांनी ती संपूर्ण रात्र काढली अन् दिवस उजाडताच तेथून ते बाहेर पडले. गुलाबी स्वप्न भंगलेयुवती आणि रजत या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते लग्न करणार होते. आमदार निवासाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वत:ची ओळख पती-पत्नी अशीच दिली होती. मात्र, मध्येच हे प्रकरण घडले. त्याची माहिती घरच्यांना कळाल्याने युवती घाबरली. त्यानंतर तिने एका मैत्रिणीच्या सहाय्याने जयपूरला जाण्याचा निर्णय घेतला. तेथे सहज जॉब मिळेल, असे युवतीला मैत्रिणीने कळविले होते. त्यामुळे तिने आणि रजत या दोघांनीही जयपूरचे रेल्वे तिकीट काढले. युवती जयपूरकडे निघाली होती अन् रजत मागून जाणार होता. मात्र, प्रकरण पोलिसांकडे गेल्याने जयपूरऐवजी काटोलपर्यंतच युवती पोहचू शकली. पुढे अपहरण, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रजत आरोपी म्हणून पोलिसांच्या कोठडीत पोहचला. आता गुलाबी शहरात जाण्याचे युवतीचे, तर तिच्याशी लग्न करून संसार थाटण्याचे रजतने रंगविलेले गुलाबी स्वप्न भंगले आहे.