शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

घरी बसून काढणाऱ्या लर्निंग लायसन्सवरही असणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:06 AM

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने घरी बसून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) देण्याची सोय उपलब्ध करून दिली ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने घरी बसून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु कुणीही परीक्षा देऊ शकत असल्याने अंध, अपंगांनासुद्धा हे लायसन्स मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर उपाय म्हणून लर्निंग लायसन्सची परीक्षा लवकरच ‘इन कॅमेरा’ होणार आहे.

केंद्र शासनाने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्या आधारावर घरबसल्या ‘लर्निंग लायसन्स’ काढणे अधिक सोपे झाले आहे. यासाठी उमेदवाराला परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर स्वत:चा आधारकार्ड नंबर टाकून विचारलेली माहिती नोंदवून व रस्ता सुरक्षेचा व्हिडीओ पाहिल्यावर लायसन्ससाठी आवश्यक असलेली परीक्षा देता येते. यात ६० टक्के अचूक उत्तरे दिल्यावर लर्निंग लायसन्सची प्रिंट मिळते. या योजनेचा लाभ आतापर्यंत शेकडो उमेदवारांनी घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी व दलालांना फाटा देण्यासाठी ही सेवा उत्तम असली तरी परीक्षेवर आरटीओची नजर राहत नाही. यामुळे एखाद्याची परीक्षा दुसरा व्यक्तीसुद्धा देऊ शकतो. यासंदर्भातील तक्रारीही वाढल्या आहेत. यावर परिवहन विभागाचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ‘इन कॅमेरा’ लर्निंग लायसन्सची परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ऑनलाईन प्रणालीत तसे बदल केले जात आहेत.

-तर लायसन्ससाठी कायमस्वरूपी अपात्र

दुसऱ्याच्या नावाने लर्निंग लायसन्सची परीक्षा देणाऱ्या प्रकरणात दोषी आढळणारा अर्जदार मोटार वाहन कायद्यानुसार लायसन्ससाठी कायमस्वरूपी अपात्र ठरतो. यामुळे महा-ई-सेवा केंद्र, ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफेवर लक्ष ठेवून हा प्रकार होत असल्यास कारवाई करण्याचा सूचना परिवहन विभागाने आरटीओ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी गैरप्रकाराच्या विरोधात आरटीओ कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

- परीक्षेचे महत्त्व पटवून दिल्यास गैरप्रकाराला आळा बसेल

मोटार वाहन कायद्यानुसार शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परीक्षा देणे आवश्यक आहे. संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहनचालकांच्या जबाबदारीचे महत्त्व सांगणारी ही परीक्षा असते. या प्रणालीचा वापर करताना पालकांनी त्यांच्या पाल्यांना परीक्षेचे महत्त्व पटवून दिल्यास, या प्रणालीचा गैरवापर होणार नाही. परंतु काही जण गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे लवकरच या परीक्षा ‘इन कॅमेरा’ घेतल्या जाणार असून, प्रणालीत तसा बदल केला जाणार आहे.

- अविनाश ढाकणे, आयुक्त परिवहन विभाग