शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
4
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
5
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
6
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
7
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
8
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
9
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
10
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
11
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
12
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
13
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
14
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
15
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
16
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
17
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
18
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
19
Richest Indian in Canada : कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
20
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप

‘त्या’ मृत शिकारी वाघाची होणार कोविड तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:41 PM

पाच जणाचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाचा (केटी वन) गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये अकस्मात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कोविड_१९ च्या दृष्टीनेही तापसणी केली जात आहे.

ठळक मुद्देनमुने भोपाळ प्रयोगशाळेत रवाना : धडधाकट वाघाच्या मृत्यूबद्दल आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच जणाचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाचा (केटी वन) गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये अकस्मात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कोविड_१९ च्या दृष्टीनेही तापसणी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्ताचे नमुने भोपाळमधील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नागपुरातील शासकीय प्रयोगशाळेतही ते पाठविण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत हा अहवाल येण्याची शक्यता आहे.चार दिवसानंतरही या वाघाच्या मृत्यूचे रहस्य कायमच आहे. त्याच्या अकस्मात झालेल्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या शंका व्यक्त होत आहेत. हा वाघ आजारी नव्हता. त्याचे वजनही १८० किलोग्रॅम होते.आणल्यावर दोनतीन दिवसानी त्याने आहार सुरू केला होता. कसलाही आजार नसल्याने कोणताही उपचार सुरू नव्हता.महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने तेथे असलेल्या एकमेव वाघिणीसाठी जोडीदार म्हणून या वाघाची मागणी केली होती. यासाठी १६ जूनला महाराज बाग व्यवस्थापनाने प्रधान मुख्य संरक्षण (वन्यजीव) कार्यालयाला पत्रही दिले होते. याच्या काही दिवसापूर्वीच एक चमूने जाऊन या वाघाची पाहणी केली होती. २२ जूनच्या पहाटे ५.३० वाजता वन कर्मचाऱ्यांनी या वाघाला एन्क्लोजरमध्ये फिरताना पाहिले. तसे व्हिडीओ फुटेजही आहेत. मात्र तासाभरातच या वाघाचा मृत्यू झाला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शवविच्छेदात त्याच्या शरीरात पस आढळला. मात्र शरीरावर कसलीही जखम नव्हती. सर्पदंशाची शक्यता वर्तविली जात असली तरी त्याच्या शरीरावर सर्पदंशाचेही व्रण आढळले नव्हते.एकंदर परिस्थिती लक्षात घेता गोरेवाडा प्रशासनाचे या वाघाचा सेफ्टीसेमियामुळे (संक्रमण) मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली आहे. मात्र वन्यजीव विशेषज्ज्ञांच्या मते, सेफ्टीसेमियासारखा आजार अ‍ॅन्टिबायोटिक देऊन सहजपणे दुरुस्त केला जाऊ शकतो. उत्तम आहार आणि औषधोपचारातूनही असा वाघ दुरुस्त होऊ शकतो.

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालयTigerवाघDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या