योगेश पांडे।नागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘आॅनलाईन’ शिक्षणावर भर दिला जात असून या प्रणालीचे भविष्यातील महत्त्व सर्वांनाच लक्षात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणातदेखील ‘डिजिटल’ माध्यमावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षणमंत्रालयात ‘आॅनलाईन’ शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष समर्पित विभागच राहणार आहे. ‘डिजिटल’ शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, साहित्य निर्मिती तसेच विविध बदलांनुसार शिक्षण तंत्रात बदल यासंदर्भात या माध्यमातून पावले उचलण्यात येतील.
तंत्रज्ञान सातत्याने बदलताना दिसून येत असून दर सहा महिन्यांत नवीन उपकरणे व तंत्र समोर येत आहे. अशा स्थितीत या विशेष विभागामार्फत त्यानुसार ‘आॅनलाईन’ शिक्षण प्रणालीतदेखील आवश्यक बदल करण्यात येईल. शालेय शिक्षण व उच्च शिक्षणातील विद्यार्थी व शिक्षकांची गरज लक्षात घेऊन ‘डिजिटल कंटेंट’ विकसित करण्यात येईल. या विभागात शिक्षणतज्ज्ञच नाही तर प्रशासकीय, तंत्रज्ञान, ‘ई-गव्हर्नन्स’ आदी क्षेत्रांतील लोकांचाही समावेश राहणार आहे. शिवाय देशपातळीवर ‘व्हर्च्युअल लॅब्स’ विकसित करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येईल.यावर मंत्रालयाचा भरच्‘पायलट स्टडी’ राबविणारच्‘डिजिटल’ पायाभूत सुविधांवर भरच् शिक्षणासाठी नवीन ‘प्लॅटफॉर्म’ विकसित करणारच्‘व्हर्च्युअल लॅब्स’ विकसित करणारच्शिक्षकांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी सुविधाच्परीक्षा व मूल्यमापनाचा आराखडा ठरविणारच्पारंपारिक व ‘डिजिटल’ शिक्षणप्रणालीची सांगड घालणारे‘मॉडेल’ तयार करणारच्शिक्षणासाठी मापदंड निश्चित करणार.जनसंवाद माध्यमांतून२४ बाय ७ धडेदेशात लोकसंख्येचा मोठा टक्का आजदेखील ‘आॅनलाईन’ माध्यमांपासून दूर आहे. हे अंतर दूर करण्यासाठी व सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना हे शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी या धोरणानुसार विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. याअंतर्गत दुरचित्रवाणी, रेडिओ, ‘कम्युनिटी रेडिओ’ या जनसंवाद माध्यमांतून वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना धडे देण्यात येतील. विविध भाषांमध्ये शिक्षण देण्याची सुविधा असणार आहे.‘अॅप’, ‘गेम्स’देखील विकसित करणारहसतखेळत व प्रात्यक्षिक आधारित ‘आॅनलाईन’ शिक्षण व्हावे यासाठी देशपातळीवर ‘डिजिटल’ संग्रह तयार करण्यात येणार आहे. यात ‘कोर्सवर्क’ची निर्मिती, ‘लर्निंग गेम्स’, ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ इत्यादींचा समावेश असेल. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध विषय तसेच भारतीय कला-संस्कृती सहजतेने कळावी यासाठी ‘गेम’आधारित ‘अॅप’देखील विकसित करण्यात येतील.