लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाघ मानवी वस्तीत शिरून माणसे, बालके व पाळीव प्राण्यांची शिकार करण्याच्याही घटना समोर येतात. मात्र मानवी वस्तीत शिरून एका वन्यजीवाने आपला जीव सोडल्याची घटना विरळाच असू शकते. अशीच एक घटना नागपुरात शनिवारी सकाळी घडली.काटोल रोडवर असलेल्या केसी अपार्टमेंटमध्ये अंगावर ठिपके असलेले एक हरीण अचानक शिरले. ते कदाचित लगतच्या गोरेवाडा भागातून आले असावे. त्याला बाहेर पडायला रस्ता न मिळाल्याने ते घाबरेघुबरे होऊन धावत सुटले. त्याला पकडायला नागरिकांनीही खूप प्रयत्न केले. नंतर वनविभागाला कळवल्यानंतर विभागाच्या पथकाने त्याला आपल्या जाळ््यात बंदिस्त केले. त्याला आता जंगलात सोडायचे असे ठरले मात्र मानवी वस्तीत शिरल्याच्या धक्क्याने व प्रचंड घाबरल्याने या मुक्या प्राण्याने आपला जीव सोडल्याची दुर्देवी बातमी मिळाली.
ते चुकून शिरले मानवी वस्तीत.. पण पुढे असे झाले की..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 3:34 PM