लोकमत न्यूज नेटवर्क सैयद मोबीननागपूर : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे शहरातील भिक्षेकरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिला व बालके चौकाचौकात भिक्षा मागताना दृष्टीस पडत आहेत. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये ते अदृश्य झाले होते. त्यामुळे ‘लोकमत’ने याविषयी अधिक चौकशी केली असता, ते इतरही कामे करीत असल्याची व भिक्षा मागणे हा त्यांचा अतिरिक्त पैसा मिळविण्याचा मार्ग असल्याची माहिती मिळाली.सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये शहर बंद होते. नागरिकांचे बाहेर जाणे-येणे अत्यंत कमी होते. त्यामुळे शहरातील भिक्षेकरी पोट भरण्यासाठी अन्य कामे करीत होते. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.ही आहेत राहण्याची ठिकाणेशहरातील भिक्षेकरी यशवंत स्टेडियम, संत्रा मार्के ट व रामझुल्याजवळ राहतात. संत्रा मार्केटमधील कुटुंबे ट्रकमधील माल रिकामा करण्याचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजीविका चालते. परंतु, अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी महिला व मुले भिक्षा मागतात.भावनेचा फायदा घेतातहे भिक्षेकरी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या भावनेचा फायदा घेतात. तान्ह्या बाळांना नशा देऊन बेशुद्ध केले जाते. त्यामुळे ते बाळ कोणतीही हालचाल करीत नाही. नागरिक त्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात.कडक कारवाई होत नाहीया भिक्षेकऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी त्यांना समजावून सोडून देतात. त्याचा भिक्षेकºयांवर काहीच परिणाम होत नाही. ते पुन्हा भिक्षा मागणे सुरू करतात. यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.चोरीच्या मुलांचा उपयोगअनेकदा भिक्षा मागण्यासाठी चोरीच्या मुलांचा उपयोग केला जातो. काही दिवसापूर्वी एका महिलेने अकोला येथून मुलाला चोरले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती महिला मुलाला रामझुल्याखाली सोडून निघून गेली होती. महिला व बालकल्याण विभागाने त्या मुलाला त्याच्या पालकापर्यंत पोहचवले होते.
ते अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षासैयद मोबीननागपूर : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे शहरातील भिक्षेकरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिला व बालके चौकाचौकात भिक्षा मागताना दृष्टीस पडत आहेत. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये ते अदृश्य झाले होते. त्यामुळे ‘लोकमत’ने याविषयी अधिक चौकशी केली असता, ते इतरही कामे करीत असल्याची व भिक्षा मागणे हा त्यांचा अतिरिक्त पैसा मिळविण्याचा मार्ग असल्याची माहिती मिळाली.सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये शहर बंद होते. नागरिकांचे बाहेर जाणे-येणे अत्यंत कमी होते. त्यामुळे शहरातील भिक्षेकरी पोट भरण्यासाठी अन्य कामे करीत होते. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.ही आहेत राहण्याची ठिकाणेशहरातील भिक्षेकरी यशवंत स्टेडियम, संत्रा मार्के ट व रामझुल्याजवळ राहतात. संत्रा मार्केटमधील कुटुंबे ट्रकमधील माल रिकामा करण्याचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजीविका चालते. परंतु, अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी महिला व मुले भिक्षा मागतात.भावनेचा फायदा घेतातहे भिक्षेकरी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या भावनेचा फायदा घेतात. तान्ह्या बाळांना नशा देऊन बेशुद्ध केले जाते. त्यामुळे ते बाळ कोणतीही हालचाल करीत नाही. नागरिक त्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात.कडक कारवाई होत नाहीया भिक्षेकऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी त्यांना समजावून सोडून देतात. त्याचा भिक्षेकºयांवर काहीच परिणाम होत नाही. ते पुन्हा भिक्षा मागणे सुरू करतात. यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.चोरीच्या मुलांचा उपयोगअनेकदा भिक्षा मागण्यासाठी चोरीच्या मुलांचा उपयोग केला जातो. काही दिवसापूर्वी एका महिलेने अकोला येथून मुलाला चोरले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती महिला मुलाला रामझुल्याखाली सोडून निघून गेली होती. महिला व बालकल्याण विभागाने त्या मुलाला त्याच्या पालकापर्यंत पोहचवले होते.