लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या आॅटोत महिलांचे दागिने आणि रोख लंपास करणाऱ्या दोघींना अटक करण्यात नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. पालो रोहित भालेकर (वय २६) आणि रिना विशाल भालेकर (वय ३०, रा. पिपरी, कन्हान) अशी महिला आरोपींची नावे आहेत.१४ सप्टेंबरला त्यांनी धावत्या आॅटोत लाखनी जि. भंडारा येथील रंजना पुरुषोत्तम ढेगे यांच्या पर्समधून मंगळसूत्र लंपास केले होते. या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर नंदनवन पोलिसांनी चौकशी सुरू केली. घटनास्थळापासून दिघोरीपर्यंतच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. त्यात पालो आणि रिनाची छायाचित्रे आढळली. त्या आधारे पोलिसांनी चौकशी करून या दोघींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवल्यानंतर पोलिसांनी चोरीचे मंगळसूत्र जप्त केले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त रवींद्र कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.चोरीसाठी चिमुकल्याचा वापरधावत्या आॅटोत चोरी करणाऱ्या महिलांची एक मोठी टोळी असली तरी दरदिवशी त्या दोन किंवा तीनच्या संख्येत सावज शोधण्यासाठी निघतात. काम आटोपले की हिस्सेवाटणी करून घेतात. विशेष म्हणजे, कुणाला शंका येऊ नये म्हणून या चोरट्या महिला सोबत चिमुकली मुलं घेऊन असतात. या गुन्ह्याच्या वेळी पालोने तीन महिन्याच्या तसेच रानोने एक वर्षाच्या चिमुकल्याला सोबत घेतले होते.
त्या चोरत होत्या धावत्या आॅटोत महिलांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:49 PM
धावत्या आॅटोत महिलांचे दागिने आणि रोख लंपास करणाऱ्या दोघींना अटक करण्यात नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. पालो रोहित भालेकर (वय २६) आणि रिना विशाल भालेकर (वय ३०, रा. पिपरी, कन्हान) अशी महिला आरोपींची नावे आहेत.
ठळक मुद्देदोघी अडकल्या नागपुरातील नंदनवन पोलिसांच्या जाळ्यात