शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

चोरट्याने केली महानगरांत जीवाची मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 11:29 AM

मालकाचा विश्वासघात करून साडेआठ लाख रुपये चोरून नेणाऱ्या चोरट्याने आधी स्वत:वर उपचार करून घेतले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या महानगरांत जाऊन जीवाची मुंबई केली.

ठळक मुद्दे आधी उपचार, नंतर ऐश, आता हातकड्या

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालकाचा विश्वासघात करून साडेआठ लाख रुपये चोरून नेणाऱ्या चोरट्याने आधी स्वत:वर उपचार करून घेतले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या महानगरांत जाऊन जीवाची मुंबई केली. सोने, दुचाकी विकत घेऊन ऐशोआरामात सहा महिने काढले. आता तो पोलिसांच्या कोठडीत पाहुणचार घेत आहे. गेल्या आठवड्यात गणेशपेठ पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक करून नागपुरात आणलेला आरोपी राजकुमार शांतिलाल गुप्ता ऊर्फ हेमंत शांतिलाल गोयल (वय ५३) याच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे.आरोपी गुप्ता ऊर्फ गोयल मूळचा पुण्याच्या रामटेकडी (हडपसर) परिसरातील रहिवासी आहे. येथील हॉटेल व्यावसायिक अफजल अबुबकर मिठ्ठा (वय ४२) यांच्याकडे तो काम करायचा. मिठ्ठा यांचा आरोपीवर खूप विश्वास होता. त्यामुळे मोठे आर्थिक व्यवहारही ते त्याला सोपवायचे. १९ आॅगस्ट २०१९ ला दुपारी १ वाजता मिठ्ठा यांनी गुप्ता ऊर्फ गोयलला ८ लाख ५५ हजाराचा चेक देऊन बँकेतून रक्कम आणायला सांगितले. दुपारी गेलेला गोयल सायंकाळ होऊनही परत न आल्यामुळे काळजीत पडलेल्या मिठ्ठा यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. साडेआठ लाखांची रोकड घेऊन बेपत्ता झालेल्या गोयलचा मोबाईल बंद होता. त्याचे अपहरण झाले असावे, अशीही शंका आली. त्यामुळे पोलिसही हादरले. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी बरीच धावाधाव केली. मात्र, तो काही हाती लागला नाही.पोलीस इकडे त्याचा शोध घेत होते तर गुप्ता सरळ पुण्याला पोहचला होता. त्याला हायड्रोसिल अन् जबड्याचे दुखणे होते. त्यावर त्याने खासगीत उपचार करून घेतले. प्रकृती चांगली झाल्यानंतर त्याने सोनसाखळी, अंगठी विकत घेतली. नंतर इंदूर गाठले. तेथे अनेक दिवस ऐशोआराम केला. तेथून जबलपूरला पोहचला. तेथेही जीवाची मुंबई करून घेतली. नंतर उत्तरप्रदेशात पोहचला. लखनौचा नवाबी पाहुणचार घेतल्यानंतर जवळच्या राजाजीपुरम (तालकटोरा) येथे त्याने बस्तान बसविले. तेथेच त्याने बनावट आधारकार्ड तयार करून मोटरसायकलही विकत घेतली.

प्रशंसनीय तपास !वाढत्या तक्रारी आणि गुन्हे यामुळे बºयाच गुन्ह्यांच्या तपासावरून एक-दीड महिन्यानंतर पोलिसांची नजर हटते. ते मागे पडलेल्या गुन्ह्यांना मागे ठेवून त्यापेक्षा मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देतात. मात्र, या प्रकरणाच्या तपासावर पोलिसांनी आपली नजर होती तशीच रोखून ठेवली. त्याच्या बँक खात्यावरही पोलिसांचे लक्ष होते. अलीकडे त्याच्या खात्यातील रक्कम राजाजीपुरमच्या एटीएममधून वारंवार काढली जात असल्याचे लक्षात येताच गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने तालकटोरा गाठले. तेथील एटीएमच्या चौकीदाराकडून गोयल-गुप्ताची माहिती काढली अन् अखेर त्याच्या मुसक्या बांधल्या. अनेक गोष्टींसाठी तरसल्यानंतर तब्बल सहा महिने जीवाची मुंबई करायला भेटली. त्यामुळे या गुन्ह्याचा गुप्ता-गोयलला पश्चात्ताप नसल्याचे पोलीस सांगतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी