लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरांचे हात सरावलेले आहेत आणि हातोडा मारल्याबरोबर धनाचा लाभ कुठून होईल, याचा ते सातत्याने वेध घेत असतात. एटीएम सेंटर हे चोरांसाठी एकमुश्त रक्कम मिळविण्यासाठीचे साधन झाले आहेत आणि या सेंटर्समधून जर तुम्ही पैसे काढत असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. रात्रीच्या नीरव शांततेत एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरटे सज्ज आहेत आणि अशात जर तुम्ही एकटे असाल तर त्यांच्या सज्जतेला तुम्हीही बळी पडण्याची शक्यता आहे.केवळ सप्टेंबर महिन्याकडे लक्ष वेधले तर एटीएममधून मोठी रक्कम लंपास करण्याच्या ६-७ घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. हरियाणा आणि बिहार येथील गयामध्ये एटीएम फोडणाऱ्या टोळीचे काही सदस्य नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे कार्ड बदलविण्याचे व त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम उडविण्याच्या घटनाही पुढे यायला लागल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यावर विचार करावा तर ‘टाळेबंदी’च्या काळात गुन्हेगारांसाठी एटीएम मशीन मोठी रक्कम काढण्याचे प्रमुख माध्यम झाले आहेत. सुरक्षारक्षक नसलेले एटीएम सेंटर तर त्यांच्यासाठी पर्वणीच ठरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी आशीर्वाद नगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून १.६६ लाख रुपये अज्ञात आरोपींनी काढले. १३ सप्टेंबरला हुडकेश्वर येथील म्हाळगीनगर चौकातील एटीएम चोरट्यांचे लक्ष्य ठरले. १४ सप्टेंबरला कळमना, नाका क्रमांक ४च्या पुढे असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून अज्ञात आरोपीने ८२ हजार रुपयांवर हात साफ केला. १५ सप्टेंबरला प्रतापनगर ठाण्याच्या हिंगणा टी-पॉर्इंट येथील एटीएममधून आरोपीने २ लाख १३ हजार रुपये काढले. वाडी येथील एटीएममधून १.८० लाख रुपयाची चोरी झाली. १६ सप्टेंबरला बेलतरोडी येथील चिंचभवन चौकात असलेल्या एसबीआय एटीएममधून ८० हजार रुपये चोरीला गेले. १७ सप्टेंबरला वर्धमाननगर येथील एटीएम फोडून १.२५ लाख रुपये लंपास करण्यात आले. २३ सप्टेंबरला वाडी येथील कॅनरा बँकेच्या एटीएममधून २.३९ लाख रुपये उडविण्यात आले. ग्रामीण भागातील एटीएम सेंटरही चोरट्यांच्या रडारवर आहेतच.रात्रीच्या वेळी मिळतो भरपूर वेळजाणकारांच्या मते, गुन्हेगारांना एटीएम मशीन्समधून मोठी रक्कम मिळण्याची गॅरन्टी असते. या मशीन्सच्या कोणत्या यंत्रणेला, कोणत्या प्रक्रियेच्या वेळी हात लावायचा, याची संपूर्ण माहिती या प्रशिक्षित अट्टल गुन्हेगारांना आहे. त्यामुळेच, चोरटे रात्री ९ वाजतापासून ते पहाटे ५.३० वाजतापर्यंतच्या काळात संधी साधत असतात. यावेळी नागरिकांची वर्दळ जवळपास नसतेच. एटीएममध्येही कुणी येत नाहीत. घटनेच्या दुसºया दिवशीच संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांना गडबड झाल्याची बाब कळते.कठोर सुरक्षा व्यवस्थेची गरजसर्वच बँकांना रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शिकेचे पालन करणे गरजेचे असल्याचे शहरातील सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी सांगितले. सर्वच सेंटर्सवर सीसीटीव्ही असतातच. परंतु, तेथे सायरन अलर्ट सिस्टिम व आर्म्स गार्ड असणे गरजेचे आहे. एटीएमच्या अंतर्गत पार्ट्स सोबत हातचलाखी करताच सायरन वाजण्याची व्यवस्था असेल तर बाजूबाजूचे लोक तात्काळ एकत्रित येऊ शकतात. परंतु, बहुतांश एटीएममध्ये सुरक्षारक्षकच नसतो. आवश्यक व्यवस्थेच्या अभावी घटनेनंतरच पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरच धावपळ करावी लागत असल्याचे बागुल म्हणाले.
नागपूर शहरातील एटीएमवर चोरटे साधताहेत डाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 12:56 AM
ATM Theft, Nagpur Crime News चोरांचे हात सरावलेले आहेत आणि हातोडा मारल्याबरोबर धनाचा लाभ कुठून होईल, याचा ते सातत्याने वेध घेत असतात. एटीएम सेंटर हे चोरांसाठी एकमुश्त रक्कम मिळविण्यासाठीचे साधन झाले आहेत आणि या सेंटर्समधून जर तुम्ही पैसे काढत असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे.
ठळक मुद्देएकमुश्त रक्कम मिळण्याच्या गॅरन्टीने ठरताहेत गुन्हेगारांच्या आवडीचे केंद्ररात्रीपासून ते पहाटेपर्यंत गर्दी कमी असल्याचा घेताहेत लाभ