लाेकमत न्यूज नेटवर्क
गुमगाव : काेराेना संकटकाळात माणुसकीलाच सर्वाेच्च प्राधान्य देत त्या कामालाच कर्तव्य धर्म मानून आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देणारे खरे काेराेना याेद्धा आहेत. त्यांच्या कार्याचे आपणही अनुकरण करावे, असे आवाहन बुटीबाेरी नगर परिषदेचे सभापती मंदार वानखेडे यांनी केले.
गुमगाव नजीकच्या कान्हाेली येथे युवा चेतना मंचतर्फे आयाेजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिल जांभुळकर, मधुसूदन चरपे, आयटीआयचे प्राचार्य कपिल मानकर, वसंत पिसे आदींची उपस्थिती हाेती. याप्रसंगी मिलिंद काेवे, राकेश बगवे, प्रवीण इंगळे, दिनेश डवरे, पूजा सयाम, आशिष शेवळे यांना काेराेना याेद्धा म्हणून गाैरविण्यात आले.
युवा चेतना मंचतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या ‘अ’ गटातील विजेते किशाेर कुंभारे, भाग्यश्री आडे, तन्मय काेवे, विनय वरखडे व ‘ब’ गटातील खुशी इटनकर, समीक्षा कंगाले, कुणाल काेवे यांना पारिताेषिके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जगदीश वानाेडे यांनी केले तर आभार मिलिंद काेवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयाेजनासाठी मयुरी सूर्यवंशी, पूजा सागरकर, पायल बगवे, स्वाती नाैकरकर, प्रमाेद बावणे, स्वप्निल वंजारी, प्रकाश दडमल, अरविंद काेवे, विकास करपते, प्रदीप इटनकर, अंकेश काेवे, पंकज आडे, शैलेश खंडारे, नंदू कुमरे, आकाश दडमल, सूरज आडे आदींनी सहकार्य केले.