लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ७ मार्चपासून खापरी ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी व्यावसायिक सेवा सुरू झाली. याकरिता हैदराबाद मेट्रो आणि चीनची सीआरआरसी कंपनीकडून मागविण्यात आलेल्या रेल्वेचा उपयोग करण्यात येत आहे. चीनहून आता तिसरी रेल्वे आली असून हैदराबाद मेट्रोच्या दोन अशा पाच रेल्वे महामेट्रोकडे झाल्या आहेत. दोन महिन्यात आणखी पाच रेल्वे जहाज मार्गाने चेन्नई आणि तेथून रस्ता मागर् ाने नागपुरात येणार असल्याची माहिती आहे.चीनहून आलेल्या रेल्वेचा उपयोग लोकमान्यनगर ते सुभाषनगरदरम्यान ट्रायल रनकरिता करण्यात येत आहे. दोन महिन्यात या मार्गावर व्यावसायिक रन सुरू होण्यापूर्वी चीनच्या सीआरआरसी कंपनीकडून आणखी रेल्वे नागपुरात येणार आहेत. चीनच्या सीआरआरसी कंपनीकडून मेट्रो रेल्वे खरेदीसाठी तत्कालीन नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (आताचे महामेट्रो) आणि सीआरआरसी कंपनीदरम्यान १५ आॅक्टोबर २०१६ ला ‘लेटर आॅफ अलॉटमेंट’वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.करारानुसार महामेट्रो सीआरआरसीकडून २३ मेट्रो रेल्वे खरेदी करणार आहे. एका रेल्वेत तीन कोच असे ६६ कोच राहणार आहेत. सीआरआरसी कंपनी चीनच्या डालियान येथील प्रकल्पात कोच तयार करीत आहेत. एका कोचची किंमत जवळपास ८ कोटी रुपये आहे. रेल्वेसाठी ३५ टक्के सुट्या भागांची निर्मिती भारत, जपान आणि अन्य देशात होत आहे. महामेट्रोचे चारही मार्गावर ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत मेट्रोच्या विस्तारीकरणाला सुरुवात होणार आहे.
नागपुरात चीनहून आली तिसरी मेट्रो रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 9:51 AM
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ७ मार्चपासून खापरी ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी व्यावसायिक सेवा सुरू झाली. याकरिता हैदराबाद मेट्रो आणि चीनची सीआरआरसी कंपनीकडून मागविण्यात आलेल्या रेल्वेचा उपयोग करण्यात येत आहे.
ठळक मुद्देआता मेट्रोकडे पाच रेल्वे दोन महिन्यात आणखी येणार पाच रेल्वे