लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-इटारसी मार्गावर घाट सेक्शनमध्ये तिगाव-चिचोंडापर्यंत थर्डलाईन टाकण्याचे काम सुरूआहे. हे काम वर्षभरात पूर्ण होणार असून त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर ते इटारसी दरम्यान मालगाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. प्रवासी गाड्यांसाठी या मार्गावर अप आणि डाऊन लाईन आहे. परंतु गाड्यांच्या वाहतुकीत गती येणाऱ्यासाठी अतिरिक्त रेल्वे लाईनची मागणी करण्यात येत होती. तिगाव ते चिचोंडापर्यंत १६ किलोमीटर लांबीची थर्डलाईन तयार झाल्यास या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार आहे. या मार्गावर अधिक रेल्वेगाड्या चालविणे शक्य होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित सेक्शनमध्ये मांडवीजवळ रेल्वे रुळावर अनेक वळणे आहेत. थर्डलाईनमध्ये ही वळणे कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
वर्षभरात तयार होणार नागपूर-इटारसी दरम्यान थर्डलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:05 AM
नागपूर-इटारसी मार्गावर घाट सेक्शनमध्ये तिगाव-चिचोंडापर्यंत थर्डलाईन टाकण्याचे काम सुरूआहे. हे काम वर्षभरात पूर्ण होणार असून त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.
ठळक मुद्देमालगाड्यांच्या वाहतुकीत येणार गती