शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

नागपुरातील वनक्षेत्र परिसरात ‘थर्टी फर्स्ट’वर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:02 AM

मुख्यालयाने दिलेल्या आदेशानुसार संरक्षित वनक्षेत्रातील विश्रामगृह दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन वर्षानिमित्त अनेक लोक वन पर्यटनाला जातात व तिथे नवीन वर्षाची पार्टी करतात. परंतु यंदा वन विभागाने यावर बंदी घातली आहे. ३१ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान वनकर्मचारी वनांमध्ये देखरेख ठेवणार आहे.वन कर्मचाऱ्यांचे एक पथक टायगर रिझर्व्ह, अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात रात्री गस्त घालणार आहे. वन मुख्यालयाने दिलेल्या आदेशानुसार संरक्षित वनक्षेत्रातील विश्रामगृह दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागझिरामध्ये वनविभागाचे दोन सरकारी रेस्ट हाऊस आहेत. पेंच, बोर टायगर रिझर्व्ह, उमरेड-कºहांडला व टिपेश्वर अभयारण्यातील रेस्ट हाऊस संरक्षित क्षेत्राबाहेर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनविभागाचे रेस्ट हाऊस वन अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही न देण्याचे आदेश आहेत. परंतु संरक्षित क्षेत्राबाहेरील पर्यटकांचे रेस्ट हाऊस सुरू राहतात. नवीन वर्षानिमित्त ३१ डिसेंबर व १ जानेवारीला जंगल सफारीसाठी बुकींग फुल्ल असतात. अशा स्थितीत पर्यटक व अन्य लोकांकडून वनांच्या क्षेत्रात पार्टी करण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता वन मुख्यालयाने सर्व टायगर रिझर्व्ह, अभयारण्य व्यवस्थापनाला विश्रामगृह बंद ठेवण्याचे सोबतच रात्री दोन दिवस गस्त लावण्याचे निर्देश दिले आहेत. वनक्षेत्रात पार्टी होताना आढळल्यास संबंधितांवर भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :New Yearनववर्ष