नागपूर : अयोध्येत ऐतिहासिक सोहळा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात रामपूजन केले. हा दिवस भारतीय अस्मितेची नवी सुरुवात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारतीय अस्मितेचा हा संघर्ष होता. आजचा दिवस पाचशे वर्षातील सर्वात पवित्र व ऐतिहासिक दिवस आहे. ती मशीद नव्हती तर कलंकाचा ढाचा होता. राजकीय स्वातंत्र्य मिळाले होते पण अध्यात्मिक स्वातंत्र्य नव्हते. ज्या देशात भूतकाळाच्या गौरवाचे पूजन होत नाही त्याचा वर्तमानकाळ तर असतो पण भविष्यकाळ नसतो. मला रामसेवेत सहभागी होता आले ही धन्यता. आज स्वप्नपूर्तीचा अनुभव येतो आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाखो संतांची इच्छा व स्वप्न पूर्ण केले. देश आनंदात असताना काही।लोक आम्ही अयोध्येत जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्या लोकांनी रामाला काल्पनिक म्हटले होते. राम म्हणजे न्याय, अयोध्येसोबत न्याय झाला. लवकरच सगळ्यांना अयोध्येत जायचे आहे. हे केवळ मंदिराचे निर्माण नसून भारताच्या नवीन अस्मितेची सुरुवात आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी सादर केले गीतयावेळी हजारो लोकांसमोर फडणवै यांनी 'जागो तो एक बार जागो जागो तो' हे गाणे सादर केले. नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे साथ दिली.