शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

मास्क नसलेल्यांना बसमध्ये प्रवेश नाही : परिवहन विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 11:54 PM

खासगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मास्क न घातलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर शहर) दिनकर मनवर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे बसेसचे करावे लागणार निर्जंतुकीकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : खासगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मास्क न घातलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर शहर) दिनकर मनवर यांनी केले आहे.महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. कंत्राटी बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष - कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. त्याचप्रमाणे उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांना वापरण्यासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची ‘थर्मल गन’द्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला ही प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास मनाई करावी. कंत्राटी बस (सिटिंग) वाहनांमध्ये प्रवासी ‘एकाआड एक’ पद्धतीने आसनस्थ होतील, अशाप्रकारे प्रवासी वाहतूक व्यवस्था असल्यास परवानगी असेल. स्लिपर बस वाहनांमध्ये डबल बर्थवर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थवर एक प्रवासी याप्रमाणे वाहतुकीस परवानगी राहणार आहे.चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत, याची खात्री करावी. प्रवासादरम्यान बस थांबविली असताना प्रवासी शारीरिक अंतर पाळतील, याची दक्षता घ्यावी. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये. प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचा लेखाजोखा ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.एसटीच्या बसेस प्रवासाला निघण्यापूर्वी त्या स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात येते. प्रवाशांना मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अजून काही सूचना दिल्यास त्या सूचनांचे पालन करण्यात येईल.- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक नागपूर

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकcorona virusकोरोना वायरस बातम्या