शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सामूहिक रजा आंदोलनात मनपाचे हजारो कर्मचारी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:32 PM

सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा घेऊन संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला.

ठळक मुद्देसातव्या वेतन आयोगाची मागणी : ९० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा घेऊ न संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला.सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी महाराष्ट्र राज्य महापालिका कामगार व कर्मचारी संघटना फेडरेशनने सामूहिक रजा आंंदोलनाचे आवाहन केले होते. महापालिकेतील बहुसंख्य कर्मचारी-शिक्षक सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात ९० टक्के कर्मचारी व शिक्षक सहभागी झाल्याचा दावा, राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी केला.महापालिका कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासह अन्य मागण्यासंदर्भात फेडरेशनच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने महापालिकांना आयुक्तांना महासभेत ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याबाबतचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शासनाला अहवाल पाठविला होता. परंतु शासनाने यावर अद्याप निर्णय जाहीर केला नसल्याने कर्मचाºयांना महापालिका प्रशासनाने सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. त्यामुळे सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता.आंदोलनात सहभागी कर्मचारी व शिक्षकांना सुरेंद्र टिंगणे,अध्यक्ष राजेश गवरे, मनपा एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष जम्मू आनंद, रंजन नलोडे, किशोर आकोजकर,देवराव मांडवकर,शेषराव गोतमारे, ईश्वर मेश्राम,मिलिंद चकोले,प्रवीण तंत्रपाळे, गौतम गेडाम, सुदाम महाजन,डॉ. बाळासाहेब बन्सोड, जयसिंग कछवाह, प्रकाश चमके, रमेश गवई, मोतीलाल जनवारी, बाबा श्रीखंडे महिला कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष कल्पना मेश्राम, प्रकाश चमके आदींनी मार्गदर्शन केले. सातवा वेतन आयोग लागू न केल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रपाल खोब्रागडे,धर्मदास मेश्राम, पुरुषोत्तम कैकाडे, राजू नन्नावरे, बळीराम शेंडे, कुणाल यादव, शीतल जांभुळकर, सुषमा नायडू, परवीन सिद्दीकी, मलविंदर कौर लांबा, गीता विष्णू, पुष्पा वर्मा, योगेश नागे, योगेश बोरकर, सत्यपाल मेश्राम, मारोती नासरे, मारोती पाल, संजय शिंगणे, अभय अफनवार आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन