शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

By admin | Published: September 26, 2015 3:02 AM

कुख्यात तुषार दलाल व त्याच्या साथीदारांनी पत्रकार रविकांत कांबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

रेस्टॉरंटमध्ये हल्ला : कुख्यात तुषार दलाल विरुद्ध गुन्हा दाखल नागपूर : कुख्यात तुषार दलाल व त्याच्या साथीदारांनी पत्रकार रविकांत कांबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हुडकेश्वर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुख्यात तुषार दलाल याला सक्करदरा येथील सेव्हन स्टार बारमध्ये झालेल्या खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वी तो संचित रजेवर सुटून आला होता. तेव्हापासून तो फरार आहे. रविकांत कांबळे हे ‘नागपूर टुडे’ या ई-पोर्टल पेपरमध्ये काम करतात. त्यांनी फरार तुषार दलाल नागपुरात कसा फिरत आहे, यासंदर्भात छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. तसेच सक्करदरा येथील खुनाच्या प्रकरणातही त्यांनी पोलिसांना बरेच सहकार्य केले होते. त्यामुळे तुषारच्या मनात रविकांतबद्दल प्रचंड राग होता. रविकांत गुरुवारी रात्री आपल्या मित्रासह हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील एका बार व रेस्टॉरंटमध्ये भोजन करायला गेले होते. तेव्हा तुषारच्या एका साथीदाराने त्यांना पाहिले. त्याने लगेच फोन करून तुषारला माहिती दिली. तुषार दलाल हा आपल्या साथीदारासह पोहोचला. तो रविकांतजवळ पोहोचला. माझ्याबाबतच तू का लिहितो, अशी विचारणा करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु रविकांतने आरडाओरड केली. त्यामुळे बारमधील बॉन्सर धावले. त्यांनी तुषारला समज दिली. त्यामुळे तो निघून गेला. रात्री उशिरा हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)