शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

फेसबुकवर झालेल्या ओळखीत प्रेमाच्या नावाखाली धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:21 PM

फेसबुक फ्रेण्डवरून ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या नावाखाली विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या एका आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देरस्त्यात अडवून विद्यार्थिनीचा विनयभंगपोलिसांकडून आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुक फ्रेण्डवरून ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या नावाखाली विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या एका आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. दीपक महेंद्र सहानी (वय १८) असे आरोपीचे नाव आहे. तो नंदनवनमधील जुन्या पोलीस चौकीजवळ राहतो.पीडित मुलगी (वय १६) महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. आरोपी सहानीसोबत तिची फेसबुकवरून काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर ते चॅटिंग करू लागले. त्यानंतर सहानीने तिला प्रपोज केले. तिने नकार दिल्याने आरोपी तिला प्रेमाच्या नावाखाली त्रास देऊ लागला.पाठलाग करणे, भेटण्याचा आग्रह धरणे, धमक्या देणे, असे प्रकार वाढल्याने मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. पालकांनी सहानी कुटुंबीयांशी संपर्क करून दीपकला समजावण्यास सांगितले. हे सर्व घडल्यामुळे दीपक काही दिवस शांत बसला. आता परत त्याचा उपद्रव सुरू झाला. बुधवारी रात्री ७ च्या सुमारास पीडित मुलगी सक्करदऱ्यातील प्रेरणा कॉलेजसमोरून जात असताना आरोपी तिला आडवा झाला. त्याने तिचा हात पकडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. मुलीने आरडाओरड केल्याने त्याने तिला शिवीगाळ करून तिला पाहून घेण्याची धमकी दिली. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून आरोपी दीपक सहानीला अटक केली.‘एचआर’कडून कर्मचारी महिलेचा विनयभंगनागपूर : कंपनीत प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीने (वय २४) बजाजनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ती ज्या कंपनीत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून काम करते, तेथे आरोपी विनोद टाकळखेडे (वय ४५) मानव संसाधन विभागाचे प्रमुख (एचआर) आहे. २८ सप्टेंबरला सायंकाळी टाकळखेडेसमोर बसून ती नोटस् घेत असताना अचानक टाकळखेडेने तिचा हात पकडून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर कंपनीच्या कार्यालयाबाहेर प्रकरणाची चर्चा होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नाही. तरुणीने गुरुवारी बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी टाकळखेडेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या दुसऱ्या पैलूंचीही पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग