लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या २४ तासात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एका वृद्धासह तिघांचा करुण अंत झाला. धंतोली, सोनेगाव आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.वर्धा मार्गावरील बाबा ट्रॅव्हल्सजवळ भरधाव ट्रक (एमएच ४०/ ६७४७) च्या आरोपी चालकाने प्रकाश पुंडलिकराव पांढरीपांडे (वय ६२) या अॅक्टिव्हाचालकाला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. पांढरीपांडे गजानननगरात राहत होते. आरोपी ट्रकचालकाने या अपघातानंतर पुन्हा एका दुचाकी आणि एका कारला धडक मारली. नंतर एका घराच्या कंपाऊंड वॉलवर धडकून ट्रक थांबला. त्यामुळे ती भिंतही तुटली. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाचा रोख लक्षात घेत आरोपी ट्रकचालक पळून गेला. ट्रकमध्ये सिलिंडर भरले होते. सुदैवाने वेळीच जमावातील काहींनी धोका ओळखून संतप्त नागरिकांची समजूत काढल्याने मोठा अनर्थ टळला.दुसरा अपघात सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. वर्धा मार्गावरील पुष्कर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दीपाली प्रमोद काटोळे (वय ३८) आणि सपना अजय मून (वय ३३) या दोन मैत्रिणी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास अॅक्टिव्हाने जात होत्या. सोमलवाड्यातील कार्गो वळणावर भरधाव ट्रॅव्हल्सच्या (एमएच ४०/ वाय ६८८६) चालकाने सपना यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्या आणि दीपाली दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी सपना मून यांना मृत घोषित केले. सोनेगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.३० ला अडाळी फाट्यावरही असाच जीवघेणा अपघात घडला. पारले फॅक्टरीत कार्यरत असलेले प्रशांत प्रकाश कडू यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीला भरधाव वाहनचालकाने धडक मारली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत अपघातापूर्वी काम आटोपून घराकडे जात होते. याप्रकरणी रवी गुरुनाथ गमे (वय ३१, रा. वैभवनगर, दिघोरी) यांनी दिलेल्यात तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात चोवीस तासात तीन अपघात : वृद्धासह तिघांचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 9:18 PM
गेल्या २४ तासात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एका वृद्धासह तिघांचा करुण अंत झाला. धंतोली, सोनेगाव आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.
ठळक मुद्देधंतोली, सोनेगाव आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल