शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

नागपूरच्या पोक्सो न्यायालयात आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:53 PM

काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देशाळकरी मुलीवरील विनयभंग प्रकरण

ऑनलाईन लोकमतनागपूर : काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विष्णू श्रीराम मरोलिया (२९), असे आरोपीचे नाव असून तो काटोल भागातीलच रहिवासी आहे.पीडित मुलगी ही आपल्या घराच्या अंगणात आईसोबत झोपलेली असताना २५ जून २०१५ रोजी रात्री १२.३० ते २.३० वाजताच्या दरम्यान आरोपीने तिचा दोन वेळा विनयभंग केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी भादंविच्या ३५४(अ), ४५१ आणि लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला २८ जून २०१५ रोजी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला पोक्सोच्या कलम ७, ८ अन्वये साडेतीन वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, भादंविच्या ४५१ कलमांतर्गत २ वर्षे सश्रम कारावास, २५० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील दीपिका गवळी यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक फौजदार अरुण भुरे, प्रमोद पाटील, रमेश भुसारी आणि हेड कॉन्स्टेबल रमेश नवले यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.

 

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर