लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशमधील एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसह तिघांना नंदनवनमध्ये अटक करून पोलिसांनी त्याच्याजवळून चार पिस्तूल तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले. मोहसिन अन्सारी ऊर्फ राजा बदरुद्दीन अन्सारी (वय ३३, रा. एकलेरा खेलनगर, परासिया, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश), सुरेश मुधकर यादव (वय ४०, रा. पेलकीपुरा कामठी) आणि निखिल नरेश चौकसे (वय ३५, रा. जेपीनगर, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील पोलीस पथकाने शुक्रवारी ही कामगिरी बजावल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.मोहसिन अन्सारी हा मध्य प्रदेशातील कुख्यात गुंड असून, त्याने चार महिन्यांपूर्वी छिंदवाड्यात एका गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर तो छिंदवाड्यातून फरार झाला. त्याच्याविरुद्ध हत्या, बलात्कार, लुटमार तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो मध्य प्रदेश पोलिसांना मोस्ट वॉन्टेड होता. नंदनवनमधील दिघोरीतील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये तो भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी नंदनवनमध्ये छापामारी करून आरोपी अन्सारीला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक देशीकट्टा आणि पाच काडतूस जप्त करण्यात आले. त्याने प्राथमिक चौकशीत त्याचा साथीदार सुरेश यादव याचेही नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्यालाही अटक केली. पोलिसांनी यादवकडून एक पिस्तूल आणि मॅगझिन जप्त केले. या दोघांची दोन दिवस चौकशी केली असता त्यांनी मोहखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाला मारहाण करून लुटलेली पाच लाखांची बोलेरो पिकअप व्हॅन तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकलही पोलिसांच्या हवाली केली. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस पथक छिंदवाड्याला रवाना करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त कदम यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संजीव कांबळे, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे उपस्थित होते.कबुतराच्या कोंड्यात पिस्तुल
नागपुरात मध्य प्रदेशमधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसह तिघांना पिस्तुलांसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 8:29 PM
मध्य प्रदेशमधील एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसह तिघांना नंदनवनमध्ये अटक करून पोलिसांनी त्याच्याजवळून चार पिस्तूल तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले.
ठळक मुद्देचार पिस्तूल, पाच काडतूस जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी