शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दुपारी अडीचनंतर बस स्थानकात तीन बॉम्ब फुटणार; चिठ्ठीने फोडला पोलीस, महामंडळाला घाम

By नरेश डोंगरे | Published: April 08, 2024 10:26 PM

गेल्या वेळी वाचले, आता वाचवता येत असेल तर वाचवा...

नागपूर : दुपारी २.३० वाजता नंतर एसटी बस स्थानकात बॉम्बस्फोटाची मालिका होणार आहे. गेल्या वेळी वाचले आता वाचवता येत असेल तर वाचवा, अशी धमकी देणारी चिठ्ठी एका समाजकंटकाने बसमध्ये सोडली. या 'चिठ्ठी-बॉम्ब'ने एसटी महामंडळ आणि पोलिसांना सोमवारी दुपारी चांगलाच घाम फोडला होता.

गोंदिया आगाराची बस क्रमांक एमएच ४० / एन ८५०१ आज दुपारी गोंदियाहून नागपूरला पोहचली. दुपारी २.३० च्या नंतर ती परत भंडारा मार्गे गोंदियाला जाणार होती. त्यामुळे चालकाने बस फलाटावर लावताच गोंदियाकडे जाणारे प्रवासी बसमध्ये शिरू लागले. दोन महिला आणि एक पुरूष बसच्या मागच्या आसनावर बसले असता त्यांना एका सीटवर एक चिठ्ठी आढळली.

त्यात ८ एप्रिलला दुपारी २.३० वाजतानंतर गणेशपेठ बसस्थानकात ३ बॉम्ब फुटणार आहेत. एचबी टाऊन आणि पारडी दरम्यानसुद्धा बॉम्ब स्फोट होणार आहे. गेल्या वेळी वाचले. यावेळी वाचवा, असा मजकूर या चिठ्ठीत हिंदीत लिहून होता. तो वाचून संबंधित प्रवाशाने लगेच बसचालक-वाहकाला माहिती दिली. त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांनी लगेच बस खाली करून घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. ऐन लोकसभा निवडणूकीची धावपळ सुरू असताना घडलेल्या या घडामोडीमुळे एसटीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही चांगलाच घाम फुटला.

कमालीची तत्परता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या (बीडीडीएस) डॉग स्कॉडला बोलवून घेतले. बस आणि बस स्थानक परिसराचा कानाकोपरा शोधून काढल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे बीडीडीएस, पोलीस आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. 

समाजकंटकाकडून जाणीवपूर्वक उपद्रवविशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गणेशपेठ आगारात एका बसमध्ये अग्निशमन यंत्र ठेवून बॉम्ब असल्याची अफवा उडविण्यात आली होती. यामुळे त्यावेळीसुद्धा प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. आता हा प्रकार घडल्याने कुणी समाजकंटक प्रवाशांमध्ये दहशत पसरविण्यासाठी जाणीवपूर्वक हा उपद्रव करत असावा, असा संशय निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरBombsस्फोटकेBlastस्फोट