नागपूर - शहरातील विविध भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. वाठोडा, शांतिनगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ९.३० च्या दरम्यान या घटना घडल्या.
राखुंडेनगर खरबी येथील प्रकाश किसन पवार (वय ३२) नामक तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लालगंज स्वीपरपुऱ्यात राहणारे संदीप दिलीप परिहार (वय ३८) यांनी गळफास लावून घेतल्याचे रविवारी रात्री १० च्या सुमारास उघडकीस आले.
एमआयडीसीतील भुरू ऊर्फ खरगसिंग बिरबल कावरे (वय ३७) यांनीही गळफास लावून घेतल्याचे रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास उघडकीस आले. मिळालेल्या सूचनेवरून उपरोक्त तिन्ही प्रकरणात अनुक्रमे वाठोडा, शांतिनगर आणि एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----