नरखेड : नरखेड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतू खैरगाव, पेठईस्माईलपूर, मदना या ग्रामपंचायतमध्ये आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडून न आल्याने तेथील संरपचपद रिक्त होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त ग्रामपंचायतीसाठी पुन्हा आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले. सुधारित सोडतीनुसार खैरगाव ग्रामपंचायतचे सरपंचपद नामाप्र, पेठईस्माईलपूर (अनुसूचित जाती) तर मदना (नामाप्र) या संवर्गासाठी राखीव झाले. त्यानुसार १२ एप्रिल रोजी तहसीलदार डी. जी. जाधव, नायब तहसीलदार (निवडणूक) संजय डांगोरे यांच्या मार्गदर्शनात उपरोक्त गावात सरपंच पदासाठी निवडणूक झाली. तीत खैरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी करूणा रवींद्र चौधरी, मदना येथे रूपराव मारोतराव हरणे तर पेठईस्माईलपूर येथे संभाजी सेवक माकोडे हे यांची निवड झाली.
-
खैरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजयी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना करुणा चौधरी व ग्रामपंचायत सदस्य.