मानकापूरच्या राजाराम सोसायटीत राहणारे आसिम इकबाल मोहम्मद अशपाक खसिब (वय ३६) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आले. आसिम उद्योजक होते. त्यांची बुटीबोरीत डस्ट कंपनी होती. लॉकडाऊनमुळे कंपनीला टाळे लागल्याने अनेक मशिनरीज बंद पडल्या. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यातून नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. नसरिम अंजूम आसिम इकबाल (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूरचे एएसआय पद्माकर धुर्वे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
दुसरी घटना शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास एमआयडीसीत उघडकीस आली. वानाडोंगरीत राहणारे सुनील चंद्रभान टिकापाल (वय ३२) यांनी गळफास लावून घेतला. सुनीलला दारूचे व्यसन होते, असे तपासात पुढे आले तरी नेमकी कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली ते स्पष्ट झाले नाही. दीपक चंद्रभान टिकापाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसीचे एपीआय शशिकांत मुसळे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
तिसरी घटना आज सकाळी ९.१५ च्या सुमारास उघडकीस आली.
गिट्टीखदानमधील गांधी चौकात राहणाऱ्या अनिता राकेश तिवारी (वय ३४) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आली. जानकीनंदन नेमधर शुक्ला (वय ३६) यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हवालदार विजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता यांचे २००४ मध्ये लग्न झाले होते. मात्र, त्यांचा पतीशी सारखा वाद व्हायचा. त्यामुळे त्यांनी २०१४ मध्ये पोलिसांकडे तक्रारही नोंदवली होती. घरगुती वादातून आलेल्या नैराश्यामुळेच अनिता यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
विष पिऊन आत्महत्या
नागपूर - वाठोड्यातील दिलीप शेषराव शिंदे (वय ६१) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. १८ नोव्हेंबरला सकाळी त्यांनी विष घेतले. त्यांना उपचारासाठी खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना त्यांना डॉक्टरांनी शनिवारी दुपारी १.१५ ला मृत घोषित केले.