शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अल्पवयीन मुलासह तीन सराईत मोबाईल चोरटे ताब्यात, १.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By योगेश पांडे | Published: July 13, 2023 5:53 PM

१.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : अल्पवयीन मुलासह तीन सराईत मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तहसील पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली आहे.

७ जुलै रोजी मध्यप्रदेशमधील शिवनी येथून नागपुरात खरेदीसाठी आलेले सुनिल झारीया यांना अग्रसेन चौकाजवळ सकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी लुटले होते. त्यांचा मोबाईलदेखील चोरून नेला होता. या प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून अन्वर अन्सारी उर्फ असरार अन्सारी (२४, अन्सारनगर, मोमीनपुरा) हा सहभागी असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला. त्याने राजेश लक्ष्मीनारायण कुशवाह (३४, नरसिंहपूर, मध्यप्रदेश) व गार्ड लाईन परिसरातील एका अल्पवयीन मुलासोबत हा गुन्हा केल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी अन्वरच्या ताब्यातून ११ मोबाईल फोन व अल्पवयीन मुलाकडून एक मोबाईल फोन असा एकूण १.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, विनायक कोल्हे, शशिकांत मुसळे, संजय शाहू, संदीप गवळी, अनंत नान्हे, शंभूसिंह किरार, पंकज निकम, पंकज बागडे, कुणाल कोरचे, वैभव कुलसंगे, रोहीदास जाधव, महेंद्र सेलोकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटकnagpurनागपूर