लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाटणकर चौक येथील बाल सुधारगृहातून तीन अल्पवयीन गुन्हेगार पळाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. फरार गुन्हेगार हे खापरखेडा येथील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी असल्याने शहर पोलीस हादरले आहे. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा कुठलाही पत्ता लागला नाही.सूत्रानुसार बुधवारी दुपारी १ वाजता बाल सुधारगृहातील गुन्हेगार भोजन करीत होते. त्यावेळी योजनाबद्ध पद्धतीने फरार आरोपींनी इतर साथीदारांशी वाद घातला. त्यांच्यात मारहाण होऊ लागली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे सुधारगृहात गोंधळ उडाला. सुरक्षा कर्मचारीही आले. या गोंधळाचा फायदा घेऊन तीन बाल गुन्हेगार फरार झाले. काही वेळानंतर ते फरार झाल्याचे लक्षात येताच सुधार गृहातील कर्मचारी हादरले. फरार अल्पवयीन आरोपींमध्ये खापरखेडा येथील बहुचर्चित आकाश पानपत्ते हत्याकाडांतील आरोपी असल्याचे सांगितले जाते. आकाशची १६ डिसेंबर २०१७ रोजी जुन्या वादात डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात आली होती. चार अल्पवयीन मुलांनी ही हत्या केली होती. अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत. या हत्याकांडामुळे खापरखेड्यात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली होती.तीन महिन्यांपूर्वीसुद्धा सुरक्षा कर्मचाऱ्यांना जखमी करून पाच बाल गुन्हेगार येथून पाळले होते. येथून पळाल्यानंतर चोरी व लुटपाट करीत होते. नंदनवन व गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना पकडले. येथून अनेकदा बाल गुन्हेगार पळून जात असतात. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही
नागपूर सुधार गृहातून पळाले तीन बाल गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:01 AM
पाटणकर चौक येथील बाल सुधारगृहातून तीन अल्पवयीन गुन्हेगार पळाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. फरार गुन्हेगार हे खापरखेडा येथील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी असल्याने शहर पोलीस हादरले आहे. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा कुठलाही पत्ता लागला नाही.
ठळक मुद्देखापरखेडा येथील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी