लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी, हुडकेश्वर आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका वृद्ध महिलेसह तिघांचा करुण अंत झाला. तर, एक महिला गंभीर जखमी आहे.शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास अमरावती मार्गावरील रविनगर चौकाजवळ झाला. फुटाळा वस्तीत राहणारे प्रकाश लक्ष्मणराव डब्बे (वय ४५) हे भरतनगर चौकाकडून रविनगर चौकाकडे सायकलने जात असताना आरोपी ट्रेलर (एचआर ६३/ सी ९४४८) च्या चालकाने प्रकाश यांच्या सायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. भूषण पांडुरंग सुरदुसे (वय २८, रा. सिव्हिल लाईन, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.शुक्रवारी रात्री ७.१५ च्या सुमारास रमणा मारोती, मित्रनगरातील रहिवासी लक्ष्मण फागोजी खोंडे (वय ६५) हे उमरेड मार्गावरील एचपी पेट्रोलपंपासमोरून रस्ता ओलांडत होते. त्यांना वेगात आलेल्या एका दुचाकीचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे खोंडे यांचा करुण अंत झाला.दुसरा अपघात गिट्टीखदानमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झाला. कांताबाई ऊर्फ प्रभा नत्थू राऊत (वय ७०) ही महिला सुनंदा राजेश भावे (वय ४१, रा. लष्करीबाग) तसेच अन्य सहकारी महिलांसोबत सोबत कॅटरिंगच्या कामावरून मध्यरात्री १.३० च्या सुमारास आॅटोत बसून घरी परत जात होती. पोलीस तलाव, सद्भावना लॉन जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कार (एमएच १२/ बीपी ०८०६)चा चालक प्रिंस अनवर कलिमुद्दीन अनवर (वय ३१, रा. महाल) याने आॅटोला जोरदार धडक मारली. त्यामुळे आॅटोतील कांताबार्इंचा मृत्यू झाला. तर, सुनंदा गंभीर जखमी झाल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.गिट्टीखदानमध्ये ठेकेदारही जबाबदारगिट्टीखदानमधील अपघाताला आरोपी कारचालकासोबत या भागात रस्त्याचे काम करणारा कंत्राटदारही जबाबदार आहे. पोलीस तलाव ते सद्भावना लॉन भागात रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. कंत्राटदाराने तेथे धोका दाखवणारे कोणतेही फलक लावले नाही. त्यामुळे परस्पर विरोधी दिशेने धावणारे वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवितात.
नागपुरात अपघातात वृद्धेसह तिघांचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 9:54 PM
अंबाझरी, हुडकेश्वर आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका वृद्ध महिलेसह तिघांचा करुण अंत झाला. तर, एक महिला गंभीर जखमी आहे.
ठळक मुद्देमहिला गंभीर जखमी : अंबाझरी, हुडकेश्वर आणि गिट्टीखदानमध्ये गुन्हे दाखल