लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पाेलिसांच्या पथकाने नगरधन (ता. रामटेक) शिवारात रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात ट्रॅक्टरचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ३ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. २६) मध्यरात्री करण्यात आली.
मंगेश टिकाराम माहुले (३४, रा. नगरधन, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. रामटेक पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नगरधन परिसरात रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने नगरधन शिवाराची पाहणी केली. यात त्यांनी विना क्रमांकाचा ट्रॅक्टर थांबवून झाडती घेतली. त्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत रेती असल्याचे निदर्शनास येताच कागदपत्रांची तपासणी केली. ती रेती विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रॅक्टरचालक मंगेश माहुले याला ताब्यात घेत अटक केली.
त्याच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि दाेन हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ३ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार प्रमाेद मक्केश्वर यांनी दिली. ही रेती ट्रॅक्टरमालक भगवान काेठेकर याच्या सांगण्यावरून वाहून नेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी ट्रॅक्टरचालक व मालकाविरुद्ध भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक नीलेश बिजवाड करीत आहेत.