लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीएए, एनआरसी बद्दल शरद पवार यांनी जी भूमिका ठेवली आहे, तीच आमची सर्वांची भूमिका आहे. महाराष्ट्रात आता तीन पक्षांचे सरकार आहे, त्यामुळे तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सवार्ना मान्य राहील. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एक ही नागरिकाचा नागरिकत्व यामुळे जाणार नाही, अशी हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.भाजप वाले स्वप्न पाहत होते की त्यांचे सरकार येईल पण तसे झाले नाही, मुंजेरीलाल सारळे स्वप्न पाहणे भाजप वाल्यानी सोडले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली. महिला अत्याचाराच्या घटना बद्दल आंध्रात जाऊन दिशा कायद्याची माहिती घेतली, महाराष्ट्रात त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी कायदा केला जाईल, असेही देशमुख म्हणाले.वारीस पठाण यांच्यावर कारवाई होणार- वारीस पठाण यांनी जे वक्तव्य केले आहे, ते अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे, आम्ही त्यांच्यावर कारवाई चे निर्देश दिले आहे, शंभर टक्के कारवाई होणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले
सीएए, एनआरसीबाबत तिन्ही पक्ष चर्चा करून निर्णय घेतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:45 PM
तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सवार्ना मान्य राहील. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एक ही नागरिकाचा नागरिकत्व यामुळे जाणार नाही, अशी हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
ठळक मुद्देशरद पवारांची भूमिका तीच आमची भूमिका