लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाल परिसरात मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत फूटवेअरच्या तीन दुकानातील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता .यामुळे काही वेळ नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.आगीत शेख फूटवेअर, शाहनवाज फूटवेअर व नॉव्हेल्टी आॅप्टिकल या दुकानांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या सिव्हील लाईन, गंजीपेठ व कॉटन मार्केट या केंद्रावरील तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. परंतु तोपर्यंत दुकानातील बराचसा माल जळून खाक झाला होता. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण होते. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत दोन लाखाचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाचे अधिकारी ए. बी.गोडे व बरडे यांचे नेतृत्वात विभागाच्या जवानांनी सव्वा तासात ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
नागपुरातील महाल येथील तीन दुकानांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:16 IST
महाल परिसरात मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत फूटवेअरच्या तीन दुकानातील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता .यामुळे काही वेळ नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
नागपुरातील महाल येथील तीन दुकानांना आग
ठळक मुद्देफूटवेअरच्या दुकानांचे लाखोचे नुकसान