लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप लागूनही प्रशासन पर्यायी उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. त्याचा फटका मात्र या चिमुकल्याना बसत आहे.अंगणवाड्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच पोषण आहारसुद्धा देण्यात येतो. त्याचबरोबर ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. अंगणवाडीच्या परिसरातील गरोदर व स्तनदा मातांची काळजी घेऊन त्यांना पोषक आहार दिला जातो. किशोरी मुलींनासुद्धा आहार पुरविण्याची योजना अंगणवाड्याच्या माध्यमातून केली जाते. या सर्व सेवा ११ सप्टेंबरपासून बंद आहेत. जिल्ह्यात जवळपास तीन हजारावर अंगणवाड्या आहेत. त्यात सहा हजाराच्या जवळपास अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. ६० हजारांवर बालके अंगणवाडीचा लाभ घेतात. कुपोषण निर्मूलनाचे महत्त्वाचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून होत आहे. संपाला १५ दिवस लोटूनही बालकांच्या, गर्भवती मातांच्या, किशोरी मुलींच्या आरोग्यासंदर्भात शासनाने पर्यायी व्यवस्था केली नाही. शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेत कार्यरत ‘आशा’ कर्मचाºयांना अंगणवाडीचा ताबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आशांनीही या कामाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे शासनाला अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. अंगणवाड्यांना सेविकांनी कुलूप ठोकले आहे.बालकांची दुरवस्था होत असल्याची आम्हाला खंत आहे. पण याला खºया अर्थाने शासन जबाबदार आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता आणि शासनाने दिलेल्या जबाबदाºया बघता अंगणवाडी सेविकांना १०,५०० व मदतनीस यांना ८,५०० रुपये मानधन करून द्यावे, ही मागणी आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.प्रीती पराते, कोषाध्यक्ष, नागपूर जिल्हा अंगणवाडी संघटना.
तीन हजारावर अंगणवाड्या १५ दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:34 AM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप लागूनही प्रशासन पर्यायी उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. त्याचा फटका मात्र या चिमुकल्याना ...
ठळक मुद्देअंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संपाचा फटका : शिक्षण व पोषण आहार ठप्प, प्रशासन हतबल