शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

तीन महिला वकील लिफ्टमध्ये गुदमरून बेशुद्ध : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:15 PM

जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी गंभीर घटना घडली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिफ्ट बंद पडल्यामुळे त्यातील तीन महिला वकील गुदमरून बेशुध्द पडल्या. त्यांच्यासह सुमारे ११ व्यक्ती १० मिनिटे लिफ्टमध्ये अडकले होते. तंत्रज्ञ आल्यानंतर लिफ्टचे दार उघडून सर्वांना बाहेर काढण्यात आले व बेशुद्ध पडलेल्या तीन महिला वकिलांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयांत भरती करण्यात आले. या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली होती. लिफ्टमधील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला असता तर प्राणहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

ठळक मुद्देखासगी रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी गंभीर घटना घडली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिफ्ट बंद पडल्यामुळे त्यातील तीन महिला वकील गुदमरून बेशुध्द पडल्या. त्यांच्यासह सुमारे ११ व्यक्ती १० मिनिटे लिफ्टमध्ये अडकले होते. तंत्रज्ञ आल्यानंतर लिफ्टचे दार उघडून सर्वांना बाहेर काढण्यात आले व बेशुद्ध पडलेल्या तीन महिलावकिलांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयांत भरती करण्यात आले. या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली होती. लिफ्टमधील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला असता तर प्राणहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.अ‍ॅड. सुधा सहारे, अ‍ॅड. शाहीन शहा व अ‍ॅड. आफरीन अशी बेशुद्ध पडलेल्या महिला वकिलांची नावे आहेत. ही घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली. संबंधित व्यक्ती न्यायालयाच्या प्रवेशद्वारापुढील एका लिफ्टमध्ये चढले होते. लिफ्ट पाचव्या माळ्यावर पोहचताच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लिफ्टचे दार उघडले नाही. परिणामी, सर्वजण आत अडकले. असह्य उकाडा व आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वांचा थरकाप उडाला. शरीरातून घामाच्या धारा वाहायला लागल्या. त्यातच तीन महिला वकील एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडून खाली कोसळल्या. त्यामुळे सोबतच्या व्यक्तींनी आरडाओरड सुरू केली. परिसरात धावपळ उडाली. दरम्यान, तंत्रज्ञांनी दहा मिनिटानंतर लिफ्टचे दार उघडण्यात यश मिळवले.जिल्हा न्यायालयातील लिफ्टस्ना पॉवर बॅकअप नाही. त्यामुळे अशा घटना नियमित घडत असतात अशी धक्कादायक माहिती वकिलांनी दिली. या घटनेच्या गांभीर्याने न्यायालय परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंगने भर घातली. बेशुद्ध महिला वकिलांना रुग्णालयात जाण्यासाठी बाहेर काढताना अडचणी आल्या. उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये जिल्हा न्यायालयात अनुचित घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना सहज आत येता यावे याकरिता मार्ग मोकळा ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मोठे वाहन आत येईल एवढी जागा मोकळी ठेवण्यात येत होती. परंतु, आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. त्याचा दुष्परिणाम आज दिसून आला.वैद्यकीय केंद्र हवेअशा घटना घडल्यानंतर पीडितांना तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्याकरिता सरकारने जिल्हा न्यायालयात वैद्यकीय उपचार केंद्र स्थापन करावे. त्या केंद्रामध्ये स्थायी डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी. तसेच, रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. लिफ्टस्ना पॉवर बॅकअप द्यावे.अ‍ॅड. कमल सतुजा, अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ संघटना.वीज केंद्राची गरजजिल्हा न्यायालयात स्वतंत्र वीज केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे. वीज केंद्र मिळाल्यास अशा गंभीर घटना घडणार नाहीत. यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. न्यायालयांना अखंड वीज पुरवठा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याचे पालन झाले पाहिजे. अ‍ॅड. नितीन तेलगोटे, मुख्य जिल्हा सरकारी वकील.

टॅग्स :AccidentअपघातWomenमहिलाadvocateवकिलCourtन्यायालय