शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

महावितरणची तीन वर्षांनंतर भरती प्रक्रियाच झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 1:01 PM

वीज वितरण कंपनीने महावितरणमध्ये मागील तीन वर्षात एकही पदभरती केली नसताना उलट नव्या पदभरती प्रक्रियेमध्ये ५४२ पदे कमी केली आहेत.

ठळक मुद्देनव्या भरतीत ५४२ पदे गोठविली उपकेंद्र सहायकांच्या पदांवर गंडांतर

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात बेकारीचा प्रश्न गंभीर झाला असल्याने केंद्र व राज्य सरकार नव्याने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नरत आहे. असे असले तरी सरकारी कंपन्या मात्र विरोधातील मार्ग अवलंबत आहेत. वीज वितरण कंपनीने महावितरणमध्ये मागील तीन वर्षात एकही पदभरती केली नसताना उलट नव्या पदभरती प्रक्रियेमध्ये ५४२ पदे कमी केली आहेत.उपकेंद्र सहायकांच्या पदांसंदर्भात हे घडले आहे. महावितरणने या पदांच्या भरतीसाठी २०१६ मध्ये अर्ज मागविले होते. एकूण दोन हजार ५४२ रिक्त पदे दर्शाविली होती. यात खुल्या प्रवर्गातील एक हजार ३७८ पदे होती. उर्वारित पदे आरक्षणाच्या नियमानुसार राखीव होती. दरम्यानच्या काळात मराठा आरक्षण आणि प्रशासकीय तांत्रिक अडचणीत ही प्रक्रिया अडली. आता तीन वर्षांनंतर महावितरणला त्या भरती प्रक्रियेची आठवण आली. कंपनीने सोमवारी २०१६ मधील ही भरती प्रक्रियाच रद्द केली. या संदर्भात अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही, मात्र त्यांचे शुल्क परत केले जाईल. ही प्रक्रिया महावितरणच्या वेबसाईटवर लवकरच दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. अर्जदारांना यासाठी आपल्या बँक खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागणार आहे. या घोषणेसोबतच महावितरणने उपकेंद्र सहायकांच्या भरतीसाठी नवीन प्रक्रिया जाहीर केली आहे. यानुसार नव्याने दोन हजार पदे भरली जाणार असून त्यातील ५४७ सामान्य वर्गासाठी असतील.मात्र २०१६ मध्ये या पदांसाठी २ हजार ५४२ पदांची जाहिरात असताना यावेळी फक्त दोन हजार पदभरती होणार आहे. त्यामुळे उपकेंद्र सहायकांची उर्वारित ५४७ पदे का कमी झाली, याबद्दल अनभिज्ञता आहे.

मराठा आरक्षण कायममराठा समाजाला विशेष मागास घटक म्हणून आरक्षण दिले आहे. नव्या प्रक्रियेमध्ये या घटकांसाठी २९ पदे आरक्षित आहेत. मागील पदभरती २ हजार ५४२ पदांची असतानाही या घटकांसाठी एवढीच पदे आरक्षित होती. सामान्य प्रवर्गावर या प्रक्रियेमध्ये अन्याय स्पष्ट दिसत आहे. मागील भरतीमध्ये १ हजार ३८७ पदे सामान्य वर्गासाठी होती. यावेळी मात्र ही संख्या ५४७ आहे.

अधिकाऱ्यांकडून मौनमहावितरणचे अधिकारी या विषयावर उघडपणे काहीच बोलायला तयार नाहीत. नव्या प्रक्रियेमध्ये पदांची संख्या घटल्याचे कंपनीने मान्य केले असले तरी, ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया असल्याने उर्वारित पदांसाठीही भविष्यात अर्ज मागविले जातील, अशी समजूत घालण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण