लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागपूर शहरात ४८८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवणे पोलिसांना शक्य होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले.पोलीस उपायुक्त कार्यालय झोन ५ यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा व्हीविंग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. याप्रसंगी झोन ५ चे पोलीस उपायुक्त हर्ष ए. पोतदार, सहायक उपायुक्त राजेश परदेशी, मोबीन पटेल, लालसिंग यादव, संध्या रायबोले, शीतल चौधरी, पोलीस निरीक्षक बापू ढेरे, पुंडलिक भटकर प्रामुख्याने उपस्थित होते.सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून झोन ५ अंतर्गत येणाºया पोलीस क्षेत्रातील दैनंदिन घडामोडी थेट दिसणार आहेत. कुठेही गडबड झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सीसीटीव्हीमुळे मदत होणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.पालकमंत्र्यांनी यावेळी पोलीस दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी निधी देणार असल्याचेही सांगितले. झोन ५ चे पोलीस उपायुक्त कार्यालय परिसरात झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधिकारी, महिला तक्रार निवारण केंद्र, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक ठेवणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:53 AM
स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागपूर शहरात ४८८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवणे पोलिसांना शक्य होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले.
ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : पोलीस उपायुक्त झोन ५ येथे सीसीटीव्ही व्हीविंग सेंटरचे उद्घाटन