नागपूर : लोकमत ‘ती’चा गणपती या अभिनव चळवळीला नागपूरसह विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलांकडून दमदार पाठिंबा मिळतो आहे. याच मालिकेत मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आर‘ती’चा तास आयोजित करण्यात आला आहे. यात घरोघरी, तसेच मंडळे व सोसायट्यांमध्ये महिलांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ती’चा गणपती उपक्रमात सहभागी होता होईल.
पुण्यात १० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या लोकमत ‘ती’चा गणपती उपक्रमाचे यंदा नागपूर व विदर्भात आगमन झाले आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या मांगल्यपर्वात खास महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, समाजातील मान्यवर भगिनी लोकमत भवनातील आरतीला उपस्थित राहत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील आणि समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना आरतीचा मान दिला जात आहे. ‘ती’च्या सन्मानासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचा आणखी विस्तार आणि ‘लोकमत’च्या वाचकांसह सामान्य नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यासाठी यावर्षी ‘आरतीचा तास’ हा नवा उपक्रम जोडला जात आहे.
या उपक्रमांतर्गत मंगळवारी सायंकाळी ७ ते ८ या दरम्यान आपल्या घरी, सोसायटीच्या गणेशोत्सवात किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जिथे कुठे आरती केली जाईल, तिथे आरतीचा मान ‘ती’ला द्यावा. तो फोटो ९८५०३०४०३७ किंवा ९९२२२०००६३ या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सॲप करावा, तसेच एक्स (आधीचे ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर #LokmatTiChaGanpati #GaneshotsavWithLokmat #Lokmat, lokmatevensnagpur अशा हॅशटॅगच्या माध्यमातून आरतीचा हा बहुमान देश व जगाच्या पातळीवर नेता येईल. ‘लोकमत’च्या सोशल मीडिया पेजेसवर हे फोटो टॅग करता येतील.
‘लोकमत’च्या प्रत्येक उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. या अनोख्या उपक्रमाला नागपूरकरांनी पाठबळ द्यावे, अशी विनंती लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. या उत्सवाला निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्था यांचे सहकार्य मिळाले आहे तर दुर्गा एम्पोरियम हे गिफ्ट पार्टनर आहेत. कॉन्ट्रॅक्टर संदीप मोटवानी व राजेश सराफ, वर्धा यांचेही योगदान आहे.
उपक्रमात व्हा सहभागी
कधी : मंगळवार, २६ सप्टेंबर
वेळ : रात्री ७ ते ८ वाजेदरम्यान
कुठे : आपल्या घरी, सोसायटीच्या गणेशोत्सवात किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात
काय : आरतीचा मान ‘ती’ला देऊन फोटो अपलाेड करा.
संपर्क : ९८५०३०४०३७ किंवा ९९२२२०००६३
#LokmatTichaGanpati