शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

ठगबाज थायलंडमध्ये पळून जाण्याच्या तयारीत

By admin | Published: February 06, 2016 2:59 AM

नागपूरकरांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारे कथित हिरे व्यावसायिक थायलंडमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

नरेश डोंगरे नागपूरनागपूरकरांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारे कथित हिरे व्यावसायिक थायलंडमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. शहर पोलिसांनी या माहितीच्या आधारे आरोपींना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणच्या विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट केले आहे.कृष्णा राजेश चतुर्वेदी आणि मजहर अली बेग अशी या ठगबाजांची नावे आहेत. त्यांनी वर्षभरापूर्वीपासून नागपूरकरांना लुटण्याचे कारस्थान रचले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रतापनगर चौकातील साई अपार्टमेंटमध्ये पॉश आॅफिस थाटले. त्यांनी येथे प्राईम केस्ट प्रमोशन कंपनी सुरू केली. दोन देखण्या तरुणींसह आणखी पाच ते सात कर्मचारी कामाला ठेवले. सूत्रांच्या माहितीनुसार ते दोघे आपल्या कर्मचाऱ्यांना हिऱ्यांचा व्यापार करीत असल्याचे सांगायचे. चमकदार हिऱ्यांचा कारभार अंधारात चालतो,असे सांगून या व्यवहारात एकाच डीलमध्ये हजारोंचे लाखो आणि लाखोंचे करोडो होतात, असे आरोपी आपल्या कर्मचारी कम एजंटस्ना सांगायचे. जेवढी रक्कम गुंतवू तेवढ्या अधिकपट रक्कम मिळवू, असा विश्वास ते द्यायचे. प्रारंभी एजंट, नंतर त्यांचे नातेवाईक, नातेवाईकांचे मित्र आणि मित्रांचे मित्र असा गोतावळा उभा करून ठगबाज चतुर्वेदी आणि बेगने शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. केवळ २० दिवसात १० चे १५ हजार आणि १ लाखाचे दीड लाख रुपये परत दिले जात असल्याचा भ्रामक प्रचार केल्यामुळे या ठगबाजांच्या कंपनीतील वर्दळ वाढली. सुरूवातील दोन-चार हजारांची रक्कम गुंतवणारांना ते तसा भक्कम परतावा देत असल्यामुळे ही आणि पुन्हा त्यात नवीन मोठी रक्कम ठेवीदार जोडत होते. अशा प्रकारे १२ जानेवारीपासून २० दिवसांकरीता लाखोंची रक्कम गुंतवणारांनी मुदत पुर्ण झाल्यामुळे १ फेब्रुवारीपासून कार्यालयात परतावा घेण्यासाठी चकरा सुरू केल्या. मात्र, त्यांना कार्यालय बंद दिसले. गुंतवणूकदारांना हादरा नागपूर : आरोपींनी अंबाझरीत एक पॉश सदनिका भाड्याने घेतली होती, तेथे काही जण जाऊन आले. तेथूनही कंपनीच्या ठगबाजांनी गाशा गुंडाळला होता. हा एकूणच प्रकार गुंतवणूकदारांना हादरा देणारा ठरला. बंगळूरुहून उडण्याचे संकेतआरोपी बेगचा एक मित्र पायलट असल्याची माहिती असून, त्याच्या मदतीने आरोपी थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण तपास यंत्रणेला लागली आहे. बंगळूरु विमानतळावरून आरोपी ‘उडन छू‘ होण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे येथील पोलिसांनी बंगळूरुसह विविध ठिकाणच्या विमानतळावर आरोपींची माहिती दिली आहे. ठिकठिकाणच्या सुरक्षा यंत्रणांनाही आरोपींची माहिती देण्यात आली असून, ठगबाज चतुर्वेदी आणि बेगच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांनी धावपळ तीव्र केली आहे.कोण आवरणार ठगबाजांना आर्थिक घोटाळ्यांची राजधानी म्हणून नागपूरचे नाव देशभरात अग्रस्थानी आले आहे. गेल्या दोन वर्षात एक डझनपेक्षा अनेक कंपन्या आणि त्यांच्या सूत्रधारांनी गोरगरीब एजंटस्ला हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटी रुपये गोळा केले आहे. त्याच्या पोलीस तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, तक्रार झाल्यानंतर काही दिवस धावपळ करून पोलीस शांत बसतात. परिणामी उपराजधानीत घोटाळेबाज कंपन्यांचे चांगभले सुरूच आहे. अजूनही शहरात १० ते १५ छोट्यामोठ्या चिटफंड कंपन्या सुरू आहेत. अशाच पैकी जरीपटक्यातील ज्वेलर्सच्या आडून सुरू असलेल्या सेसवानीच्या चिटफंड कंपनीची गुरुवारी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या व अशा अनेक कंपन्यांकडे पोलीस गंभीरपणे बघायला तयार नसल्याने लोभात पडलेल्या हजारो गुंतवणूकदारांना आपल्या आयुष्याची कमाई गमवावी लागत आहे. (प्रतिनिधी)