शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

या वाघाला कुणीतरी पकडा हो !

By जितेंद्र ढवळे | Published: April 30, 2024 2:08 PM

Nagpur : आजवर शंभर जनावरांचा घेतला जीव

नागपूर (पारशिवनी) : पारशिवनी तालुक्यात गत दोन महिन्यांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. दोन महिन्यांत जवळपास ४० जनावरांचा वाघाने बळी घेतला. यासोबतच एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत एकूण १०० जनावरे वाघाने मारली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

सोमवारी (दि. २९) पहाटे चिचभुवन येथील विठ्ठल वडस्कर यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या जर्सी गाईचा वाघाने फडशा पाडला. तसेच काही दिवसांपूर्वी त्याच्या शेतातील बांधलेली कालवड मारली. यात विठ्ठल वडस्कर यांचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सोमवारी भागीमहारी व कान्हादेवी येथील शेतकऱ्यांच्या बकऱ्या वाघाने मारल्या. मार्च व एप्रिल महिन्यात वाघाने वेगवेगळ्या गावात ४० जनावरांचा बळी घेतला आहे. गत महिन्यात चारगाव परिसरात ५ वाघाने हैदोस घातला होता. त्यांनी १० दिवस चारगाव परिसरातच ठिय्या मांडला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अवघड झाले होते. १७ एप्रिल ते आजपर्यंत नयाकुंड, माहुली, पालोरा, मेहंदी, चिचभुवन या परिसरात वाघाने हैदोस घातला आहे.पारशिवनी तालुका हा आदिवासी बहुल, जंगलव्याप्त तालुका आहे. वाघाला बघायचे असल्यास जंगलात जावे लागते. तेही वाघाचे दर्शन होईल हे सांगता येत नाही; परंतु गेल्या दोन महिन्यांत अनेक नागरिकांना शेतात, नदीच्या काठावर, रस्त्यावर, पहाडीला लागून एक नव्हे तर पाच वाघांचे दर्शन होत होते. सध्या नयाकुंड परिसरात एका वाघाने ठिय्या मांडला आहे. तो सभोवतालच्या ५ किमी अंतरावर पाळीव प्राण्यांची शिकार करीत आहे.वनविभागाच्या प्रयत्नांना अपयशपारशिवनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी कर्मचाऱ्यांसह वाघाला पकडण्याकरिता शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. पिंजरे देखील लावले. तसेच इंजेक्शनद्वारे वाघाला बेशुद्ध करून पकडण्याकरिता प्रयत्न देखील केले; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. उलट एका घटनेत वाघाने एका वन अधिकाऱ्यावर हल्ला केला तर इतर दोन घटनेत कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी मागे फिरावे लागले.

 

टॅग्स :AccidentअपघातTigerवाघnagpurनागपूर