नागपूर: मिहान परिसरातील दाट झाडीझुडपमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून दडून बसलेल्या वाघोबाची वनविभागाच्या पथकाशी जणू लपाछपी सुरू आहे.
पंधरा दिवसापूर्वी हा वाघ मिहान परिसरातील इन्फोसिस कंपनीच्या परिसरात आढळला होता. त्यानंतर मिहान परिसरातील व बुट्टीबोरी परिसरातील गावांच्या शेतशिवारातही तो दिसला होता. वनविभागाने त्याच्या शोधासाठी कॅमेरे लावले आहेत. त्यालाही त्याने हुलकावणी दिली. या आठवड्यात 27 नोव्हेंबर व 29 नोव्हेंबरला तो कॅमेरामध्ये आढळला, मात्र अजून वनविभागाच्या टप्प्यात आलेला नाही. त्याच्या शोधासाठी वन विभागाने पुन्हा पथकांची संख्या वाढवली आहे.