लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील वाघांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येपुढे जंगल अपुरे पडत असल्याने नवे वाघ नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. अशा नव्या क्षेत्रात राहू पहाणाऱ्या वाघांसाठी नियोजन मात्र कमी पडत आहे. त्यामुळे वाघ पोहचले पण वनविभाग पोहचला नाही, अशी स्थिती पूर्व विदर्भातील काही भागामध्ये दिसत आहे.चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून वनविभागाच्या नकाशावर जगापुढे येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक ल्प हे मुख्य आश्रयस्थान आहे. त्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढली असली तरी तीदेखील आता अपुरी पडायला लागली आहे. परिणामत: या क्षेत्रातून स्थलांतरित झालेल्या वाघांची संख्या ब्रह्मपुरी डिव्हीजनमध्ये वाढली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वेस असणाऱ्या वडसा डिव्हीजनमध्ये यासाठी बराच वाव आहे. वाघांनी या वन विभागात अधिवास शोधायला सुरुवात केली आहे. हा बदल लक्षात घेऊन वनविभागाकडून संसाधनांसह निधीसारख्या नियोजनाची अपेक्षा आहे. या क्षेत्रात वाघांची संख्या वाढायला लागल्याने मानववन्यजीव संघर्षासोबतच वाघांमध्येही संघर्ष व्हायला लागला आहे. चितेगाव वन परिक्षेत्रामध्ये झालेली वाघांची झुंज हे त्याचेच उदाहरण मानले जात आहे. यातूनच वाघ पकडण्याची मागणीही वाढायला लागली आहे.वन विभागाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, प्राणहिता आणि चपराळा अभयारण्य जाहीर केले आहे तर महाराष्टÑ, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील कोलमार्का हे रानम्हशींसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे. नव्या अधिवासांच्या शोधात निघालेल्या वाघांसाठी हे संरक्षित क्षेत्र असले तरी अद्याप बºयाच तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नाही. म्हणूनच नव्या क्षेत्रात वाघ पोहचत असतानाही वन विभाग पोहचला नाही, असे चित्र पुढे येत आहे. अन्नसाखळी मजबूत करणे हे यातील महत्त्वाचे आवाहन आहे.कायद्यासोबतच हवे प्रत्यक्ष संरक्षणभामरागड आणि प्राणहिता या अभयारण्यामध्ये वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. भूप्रदेश, नक्षलवादी कारवाया, आदिवासींचे जनजीवन या बाबी लक्षात घेता कायद्याच्या संरक्षणासोबतच वन्यजीवांना प्रत्यक्ष संरक्षण पुरविताना वन विभागाचा येथे कस लागणार आहे. चपराळा अभयारण्य जाहीर होऊन बरीच वर्षे लोटली. तरी अद्यापही वन विभागाकडून येथे म्हणावे तसे चित्र दिसत नाही. यातील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन नियोजन आखण्याचीही गरज आहे.नव्या क्षेत्रात वाघ स्थिरावणे ही आनंदाची बाब आहे. मात्र वाघांचा नवा अधिवास लक्षात घेऊन वन विभागाने तृणभक्षी प्राण्यांसोबत वन व्यवस्थापनाकरिता आवश्यक निधी व संसाधनांची पूर्तता करण्याची अपेक्षा आहे. वाघांचे कृत्रिम स्थलांतरण करताना नैसर्गिक स्थलांतरणात येणाºया अडचणी देखील ओळखाव्या._ बंडू धोत्रे, सदस्य, राज्य वन्यजीव समिती