शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पेंचमध्ये वाढताहेत वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:12 AM

उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे.

ठळक मुद्देतीन गावांसह इतरांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न२५८ वर्ग किमी कोरमध्ये मानसिंहदेव अभयारण्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे.विदर्भात वन्यजीवांनी परिपूर्ण असलेल्या पेंच जंगलाला १९९९ मध्ये पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून नोटिफाईड करण्यात आले. यादरम्यान केवळ २५७.२६ वर्ग किमीच्या कोर क्षेत्रासह पेंच सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प होते. परंतु वन संरक्षणावर अधिक लक्ष दिल्याने पेंचमध्ये वाघांच्या संख्येत वाढ नोंदविल्या जाऊ लागली. यामुळे वाघांचे अधिवास क्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नांतर्गत काही वर्षांपूर्वी मानसिंहदेव अभयारण्याचे १८२ वर्ग किमी वनक्षेत्र मिळवून पेंचचे कोर (कॅपिटल हॅबिटेट) क्षेत्र एकूण ४३९.२६ वर्ग किमी झाले आहे. यासोबतच नागलवाडी, सुरेवानी, खुबाळा आदी वन विकास महामंडळ व व प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्राला बफर क्षेत्र म्हणून पेंचला जोडण्यात आले आहे. याप्रकारे पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ७४१.२६ वर्ग किमी झाले आहे. यानंतर पेंचमध्ये वाघांची संख्या २०१३-१४ मध्ये १९ वरून वाढून २०१६-१७ मध्ये ४४ पर्यंत पोहोचली आहे.ही माहिती वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित पत्रपरिषदेत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, २०१७-१८ च्या व्याघ्र गणनेचा रिपोर्ट जानेवारी २०१९ पर्यंत स्पष्ट होईल. गोवेकर यांनी सांगितले की, वन्यजीवांच्या क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप कमी करण्याच्या उद्देशाने कोर क्षेत्राला लागून असलेल्या घाटकोपरा, सालईघाट, फिरंगीसरा आणि इतर गावांतील गावकऱ्यांच्या सहमतीने वनक्षेत्रातून बाहेर पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जात आहे.दुसरीकडे तोतलाडोह कॉलनी पूर्णपणे हटवून फुलझरी गावाच्या अर्ध्या गावकऱ्यांचे वनक्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आलेले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांच्यानुसार केवळ नागलवाडी परिक्षेत्रांतर्गत ११ वाघ आणि ६ वाघाच्या बछड्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली आहे. वन विकास महामंडळाचे वनक्षेत्र पेंचमध्ये सामील झाल्याने वन्यजीवांना आता विस्तीर्ण हिरवेगार जंगल उपलब्ध झाले आहे.पर्यटनातून गावातील विकास कामेक्षेत्र संचालक गोवेकर यांनी सांगितले की, पेंचमध्ये वर्ष २०१७-१८ मध्ये २९,३४९ पर्यटकांकडून २ कोटी १ लाख ९३ हजार रुपयाचा महसूल मिळाला आहे. पर्यटन हा मुख्य उद्देश नाही. परंतु पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून बफर वनक्षेत्रातील गावांमध्ये हँडपंप, गॅस सिलिंडरचे वितरण आणि गावातील बेरोजगार युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन नोकरी लवण्यात मदत केली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघ