लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात आला आहे. मात्र या खासगी ‘कॅब’मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहिल्याच दिवशी ताटकळण्याची वेळ आली व अनेक जण पावसामुळे नव्हे तर घामामुळेच ओले झाल्याचे चित्र दिसून आले.हिवाळी अधिवेशनात बाहेरून गाड्या अधिग्रहित केल्या जातात. पावसाळ्यात पूर परिस्थिती तसेच इतर आपत्कालीन कामांसाठी वाहनांची गरज असल्याने खासगी ‘कॅब’ कंपनीची सेवा घेण्यात येत आहे. अधिवेशनासाठी मुंबईतून आलेले मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी, मंत्र्यांचे कर्मचारी यांना यंदा ही सेवा पुरविण्यात आली आहे. याचे सर्व भाडे सरकार भरत असून यासाठी विशेष ‘अॅप’देखील तयार करण्यात आले आहे.मात्र पहिल्याच दिवशी या सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप झाला. सुरक्षेच्या कारणांमुळे या ‘कॅब’ विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आणू दिल्या जात नसून त्यांचे ‘पार्किंग’ लांब ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी अनेक कर्मचाऱ्यांना पायपीट करावी लागली. शिवाय बुधवारी ढगाळ व दमट वातावरण होते. त्यामुळे अनेक जण घामामुळे ओलेचिंब झाले.
खासगी ‘कॅब’मुळे ‘ओलं’ होण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 1:00 AM
दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात आला आहे. मात्र या खासगी ‘कॅब’मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहिल्याच दिवशी ताटकळण्याची वेळ आली व अनेक जण पावसामुळे नव्हे तर घामामुळेच ओले झाल्याचे चित्र दिसून आले.
ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप