लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील २४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. आज १५ ऑगस्टला पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते हे मानाचे पदक बहाल करून त्यांचा गाैरव केला जाणार आहे.
पारडीचे ठाणेदार सुनील गांगुर्डे, लकडगंजचे उपनिरीक्षक वैभव वारंगे, नवीन कामठीचे उपनिरीक्षक अब्दुल शकील, विजय नेमाडे, विशेष शाखेतील सहायक उपनिरीक्षक राजू कोठेकर, गुन्हे शाखेचे गजानन तांदुळकर, वसंता चौरे, मानकापूरचे राजू पोतदार, आर्थिक गुन्हे शाखेचे सुरेश वानखेडे, यशोधरानगरचे दिनेश यादव, एनपीसी वर्षा पटले, जितू चाैधरी आदींना चार महिन्यांपूर्वी पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह घोषित झाले आहे. १ मे, २०२१ला हे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, त्यावेळी तो सोहळा टाळण्यात आला. आता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त अमितेशकुमार, तसेच शहरातील अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह बहाल करण्यात येणार आहे.
----