शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

आज प्रचारतोफा थंडावणार : शक्तिप्रदर्शनावर राहणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:29 AM

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील धडाक्यात सुरू असलेल्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहेत. नियमानुसार मतदानाच्या ४८ तासापूर्वी प्रचार थांबवला जातो. त्यानंतर कुणालाही प्रचार करता येणार नाही. उमेदवारांना गृहभेटी मात्र करता येतील.

ठळक मुद्देसायंकाळी ६ नंतर प्रचार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील धडाक्यात सुरू असलेल्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहेत. नियमानुसार मतदानाच्या ४८ तासापूर्वी प्रचार थांबवला जातो. त्यानंतर कुणालाही प्रचार करता येणार नाही. उमेदवारांना गृहभेटी मात्र करता येतील.पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या ११ एप्रिल रोजी होणार आहे. यात नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. या दोन्ही मतदार संघात मंगळवारपासून प्रचार थांबेल. शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा जोर शहरात रॅली काढून प्रचारावर राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता प्रचार संपणार असल्याने, जाहीर सभा दुपारीच आटोपण्यात येणार आहेत. एकूणच शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांकडून शक्तिप्रदर्शन होणार आहे. मतदानासाठी निवडणूक विभाग पूर्णपणे सज्ज आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ४,४२९ मतदान केंद्र आहेत. यात नागपूर लोकसभेमध्ये २०६५ मतदान केंद्र तर रामटेक लोकसभेसाठी २३६४ मतदान केंद्र आहेत. एकूण २३ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी तैनात आहेत. मतदान प्रक्रियेत सहभागी होणारी पोलिंग पार्टी तयार झाली असून, त्यांचे पुन्हा प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. बुधवारी पोलिंग पार्टीला साहित्य वितरित केले जाईल.वाहनांची परवानगीही संपणारनिवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाच्या ४८ तासापूर्वी प्रचार बंद करायचा आहे. तो मंगळवारी ६ वाजेपासून बंद होईल. त्यानंतर राजकीय पक्षांना प्रचारासाठी असलेल्या वाहनांची परवानगी आपोआपच संपेल.दिव्यांग मतदारांकडून भरून घेणार ‘फिड बॅक’ फॉर्मपारदर्शक, निर्भीड वातावरणनिर्मितीतून १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने यंदा कंबर कसली आहे. त्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदलही केले असून, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका, अनुक्रमांकाचे स्टिकर अन्य दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी मागणीनुसार वाहनांची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रावर आवश्यक सर्व सोयीसुविधाही पुरविण्यात येईल. तसेच केंद्रावर पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत ’फिड बॅक’ फॉर्मही दिव्यांग मतदारांकडून भरून घेण्यात येईल.४४० मतदान केंद्रांवर थेट लाईव्ह ब्रॉडकास्टिंगमतदान प्रतिनिधींसाठी मतदान केंद्रावर प्रवेशपास व नोंदवही ठेवली जाईल. जिल्ह्यातील असंवेदनशील ८२ मतदान केंद्रांसह तब्बल ४४० मतदान केंद्रांमध्ये थेट लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केले जाणार आहे. याचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे दिसणार आहे. जिल्ह्यात विधानसभेचे १२ मतदार संघ असून, या प्रत्येक क्षेत्रासाठी लाईव्ह ब्रॉडकास्टिंग स्क्रीन वेगवेगळे राहणार आहेत. यासाठी एक मायक्रो ऑब्झरव्हरही देखरेखीसाठी नेमण्यात येणार आहे. यासह ईव्हीएमवरील शंकेचे निरसन म्हणून व्हीव्हीपॅट यंत्रे मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिली आहेत. मतदान केंद्रावर ईव्हीएमचे डमी मॉडेल सुविधा उपलब्ध करून दिले जाईल. मतदान कक्षात व दर्शनी भागात मतदारांनी घ्यावयाची प्रतिज्ञेची प्रत लावली जाईल. बीएलओमार्फतच फोटो व्होटर स्लीपचे वाटप केले जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सूक्ष्म निरीक्षक व केंद्रीय पोलीस बल तैनात केले जाणार आहे. मतदारांचे नाव न सापडल्याने अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. ही समस्या लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्राबाहेर बीएलओकडे इंग्रजी वर्णानुक्रमाच्या मतदार याद्या असतील. मतदान प्रक्रिया अधिक सुलभ होऊन मतदारांचा या प्रक्रियेवर विश्वास निर्माण व्हावा, यासाठी आयोगाने हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019