स्वयंसेवक करणार जनजागृती : विविध चौकात राबविणार उपक्रम नागपूर : जगभराच्या तापमानाने सध्या धोक्याची पातळी ओलांडली आहे. संपूर्ण जगात पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवण्यावर चर्चा घडतेय. विविध शास्त्रज्ञ यावर उपाययोजना सुचवित आहेत. याच पार्श्वभूमीवर पृथ्वीवरील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जगभरात २५ मार्च रोजी ‘अर्थ अवर डे’ पाळला जातो. या निमित्त आज, शनिवारी महापालिका व ग्रीन व्हीजीलतर्फे सीताबर्डी येथील इटर्निटी मॉलमध्ये रात्री ८.३० ते ९.३० दरम्यान विद्युतपुरवठा बंद ठेवून ऊर्जा बचतीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आमदार प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविला जाईल. यावेळी ग्रीन व्हीजीलचे स्वयंसेवक मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना ऊर्जा बचतीबाबत जनजागृतीपर संदेश देतील. मनपा व ग्रीन व्हीजील संस्थेतर्फे दर पौर्णमेला हा उपक्रम नागपूर शहरातील विविध चौकात सातत्याने राबविला जातो. यावर्षी २०१७ पासून हाच उपक्रम मनपा व ग्रीन व्हीजीलतर्फे सातत्याने राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेतर्फे आज ‘अर्थ अवर’
By admin | Published: March 25, 2017 3:05 AM