शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

उद्याचा दिवस ‘लोक’मताचा, पोलिंग पार्टी रवाना, मतदारांमध्ये उत्सुकता

By आनंद डेकाटे | Updated: April 18, 2024 14:17 IST

lok sabha election 2024 : वंचितचे शंकर चहांदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता २७ उमेदवार मैदानात आहेत.

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूररामटेक लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २६ उमेदवार नशीब आजमावत असून यात भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे विकास ठाकरे, बसपाचे योगेश लांजेवार, बीआरएसपीचे विशेष फुटाणे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार होते. यापैकी वंचितचे शंकर चहांदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता २७ उमेदवार मैदानात आहेत.

वंचितने येथे अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना समर्थन दिले आहे. यासोबतच शिवसेना (शिंदे ) कडून राजू पारवे, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, बसपाचे संदीप मेश्राम, बीआरएसपीचे ॲड. भीमराव शेंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात होईल. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नवमतदारांमध्ये विशेष उत्साह असल्याचे चित्र आहे.

निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याअगोदरपासूनच नागपूरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. याशिवाय सर्वच उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचार करत मतदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशीदेखील उमेदवार व राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

मतदार संघावर नजरनागपूरउमेदवार : २६मतदार : २२,२३,२८१मतदान केंद्र : २१०५

रामटेकउमेदवार : २८मतदार : २०,४९,०८५

मतदान केंद्र : २४०५नागपूरमध्ये २२ लाख २३ हजार २८१ मतदारनागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २३ हजार २८१ मतदार आहेत. यामध्ये ११ लाख १३ हजार १८२ पुरुष मतदार आहेत. तर ११ लाख ९ हजार ८७६ महिला मतदार आहेत. यासोबतच २२३ तृतीयपंथी मतदार आहेत. रामटेकमध्ये २० लाख ४९ हजार ८५ मतदाररामटेक लोकसभा मतदार संघात एकूण २० लाख ४९ हजार ८५ मतदार आहेत. यापैकी १० लाख ४४ हजार ८९१ मतदार हे पुरुष मतदार आहेत. तर १० लाख ४ हजार १४२ मतदार हे महिला मतदार आहेत. यासोबतच ५२ तृतीयपंथी मतदार आहेत. 

टॅग्स :ramtek-pcरामटेकnagpurनागपूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४